एक्स्प्लोर
VIDEO : ...आणि चालता चालता काजोल जमिनीवर पडली!
मॉलमध्ये काजोलच्या आजूबाजूला गर्दी होती. त्यापैकी कोणीतरी तिचा व्हिडीओ काहींनी रेकॉर्ड केला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अनेक बॉडीगार्डच्या सुरक्षेच्या वेढ्यात चालणारी काजोल अचानक जमिनीवर घसरुन पडली. तिने गार्डचा शर्ट पकडून सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयश ठरली. मुंबईतील एका मॉलमधील दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी काजोल जात होती. पण यावेळी घडलेला प्रसंग सगळ्यांच्याच लक्षात राहिल. मॉलमध्ये चालताना काजोलचा तोल गेला आणि ती घसरुन जमिनीवर पडली. मॉलमध्ये काजोलच्या आजूबाजूला गर्दी होती. त्यापैकी कोणीतरी तिचा व्हिडीओ काहींनी रेकॉर्ड केला. केवळ दोन तासात सुमारे दहा हजार लोकांनी पाहिला असून कमेंट्सही केल्या आहेत.
मात्र काजोलने हा प्रसंग हसण्यावारी घेतला आणि ज्या कामासाठी मॉलमध्ये आली होती, ते करण्यासाठी पुढे गेली. यानंतर तिने अनेक फोटोही काढून घेतले. दरम्यान, काजोलने नुकताच अॅनिमेटेड फिल्म 'इन्क्रिडिबल्स 2' साठी आवाज दिला आहे. या सिनेमा हिंदी भाषेत डबिंग केलं आहे. त्याचं प्रमोशन करण्यासाठी ती विविध ठिकाणी जात आहे. हा चित्रपट आज म्हणजे 22 जून रोजी प्रदर्शित होत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























