एक्स्प्लोर

Mrs Asia GB Sonal Kale : मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर

Sonal Kale : मराठमोळ्या सोनल काळेने 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब आपल्या नावावर केला आहे.

Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी, मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा (MRS. Asia Great Britain) किताब आपल्या नावावर केला आहे.  ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

सोनलने लिहिलं आहे,"नमस्कार... मी सोनल काळे... बॉलिवूडची कोरिओग्राफर असण्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुअंसरदेखील आहे. कंटेट क्रिएट करण्याची मला आवड आहे. मी जन्माने भारतीय आहे. मनाने महाराष्ट्रीअन आहे तर राहायला परदेशात आहे. मी गुजराती व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. मला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा अभिमान आहे. एक नवीन संस्कृती आत्मसात करायला मला आवडतं". 

View this post on Instagram
 
A post shared by S O N A L K A L E | Chai lover | Dancer | model (@chaiwali_ladki)

सोनलने पुढे लिहिलं आहे,"मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं आहे. आता माझ्या स्वप्नांना मी सत्यात उतरवलं आहे. या स्पर्धेने आता मला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. आता मला माझं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली करायचं आहे. तसेच नवोदितांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मी त्यांना मदत करेल. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी मी मदत करेल".  

सोनलचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथील एका गुजराती व्यक्तीसोबत लग्न केलं. आता तिचे आई-वडील मुंबईत राहत असून त्यांना आपल्या लेकीचा अभिमान आहे. सोनल ही  एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे.

'मिस आशिया ग्रेट ब्रिटन' स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर सोनलने खास पोस्ट केली होती. तिने लिहिलं होतं,"Mrs Asia GB या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्वास मिळवणे हा आहे.  माझ्या नवीन प्रवासात मला अशा लोकांसाठी रोल मॉडेल व्हायचे आहे ज्यांच्यामध्ये नृत्य करण्याचा, स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास नाही.  म्हणून मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे".

सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. 'चायवाली लडकी' म्हणून ती लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 

संबंधित बातम्या

Mrs Asia GB: कौतुकास्पद! मराठमोळी सोनल काळे ठरली Mrs Asia GB सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget