एक्स्प्लोर
तृप्ती देसाईंच्या आयुष्यावर चित्रपट, मुख्य भूमिकेत...

मुंबई : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आयुष्यावर लवकरच एखादा सिनेमा येण्याची शक्यता आहे. खुद्द देसाईंनीच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. मात्र तृप्ती देसाईंची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज आणि दिग्दर्शक दीपक बलराज वीज आमच्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी आमचं अभिनंदन केलं. लवकरच आमचं आंदोलन आणि माझ्या आयुष्यावर चित्रपटनिर्मिती करण्याची घोषणा त्यांनी केली.' असं देसाई यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. तृप्ती देसाई यांनी किशोरी आणि बलराज यांचे आभारही व्यक्त केले आहेत. आमच्या संघर्षाला मोठं स्थान दिल्याबद्दल धन्यवाद, असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. तृप्ती यांनी फेसबुकवर या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. तृप्ती देसाई यांना बिग बॉसच्या दहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांनी बिग बॉसचा आवाज महिलेचा असेल, तरच होकार देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर देसाई यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवेश बारगळला. आता चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं कार्य सर्वांसमोर येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























