एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'घाणेकर'ला प्राईम टाईम न दिल्यास मनसेचा खळ्ळ खट्यॅकचा इशारा
कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो आहे.
कल्याण : कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यास 'खळ्ळ खट्यॅक' करण्याचा इशारा मनसेने 'सिनेमॅक्स'ला दिला आहे. या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात. मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहात केवळ दुपारी तीन वाजता या सिनेमाचा शो आहे.
दुसरीकडे, आमिर खान-अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचे दिवसातून आठ खेळ होतात. आधीच दिवाळीचे दिवस, त्यात मराठमोळ्या सिनेमाला अडनिडी वेळ दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे.
हिंदी सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी, हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. मनसे याविरोधात अनेक वेळा आवाज उठवतानाही दिसते. सिनेमाला आज प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी सिनेमॅक्सला दिला आहे. मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement