कधीकाळी निर्मात्यांची रांग लागायची अन् आता भीक मागायची वेळ; अंगावर काटा आणणारी अभिनेत्रीची कहाणी
Mitali Sharma: आज अशा एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात जिने एकेकाळी सिनेसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलं होतं. पण नंतर तिला पोटभरण्यासाठी भीक मागावी लागली.

Mitali Sharma: दरवर्षी मुंबईत अनेक लोक बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम करण्यासाठी आणि अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी येत असतात, पण यात मोजक्याच लोकांना यश मिळते. अनेकजण अपयश सहन करू शकत नाहीत. काही जण अपयश मिळाल्यानंतर पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग अवलंबतात. आज अशा एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात जिने एकेकाळी सिनेसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलं होतं. पण नंतर तिला पोटभरण्यासाठी भीक मागावी लागली.
लोकप्रियता मिळाली पण फ्लॉप चित्रपटांनंतर काम मिळणं बंद झालं
भोजपुरी सिने- अभिनेत्री मिताली शर्माच्या (Mitali Sharma) करिअरच्या सुरुवातीचे चित्रपट खूप लोकप्रिय झाले होते. ज्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी तिच्याकडे इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त लक्ष दिले. जेव्हा मितालीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप ठरले, तेव्हा चित्रपट निर्माते तिला चित्रपटात कास्ट करत नव्हते. एक वेळ अशी आली की मितालीला काम मिळणे पूर्णपणे बंद झाले. ती अपयश सहन करू शकली नाही. तिच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम झाला.मितालीवर रस्त्यावर भीक मागायची वेळ आली होती. तिला जगण्यासाठी चोरी देखील करावी लागली होती.
मितालीवर आली भीक मागण्याची वेळ, एका घटनेनंतर पोलिसांनी केली अटक
रिपोर्ट्सनुसार, मिताली शर्माने मुंबईतील (Mumbai) लोखंडवाला येथे भीक मागायला सुरुवात केली होती. रस्त्यात चोरी करताना मितालीला पोलिसांनी पकडलं होतं. मितालीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. महिला पोलिसांनी जेव्हा मितालीला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आधी शिवीगाळ केली आणि नंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला.
आर्थिक अडचणींचा मितालीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला
मिताली शर्मा ही दिल्लीची (Delhi) आहे. तिने मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम केलं. अभिनेत्री बनण्याच्या इच्छेने मिताली ही घर सोडून मुंबईत आली. मुंबईत काही चित्रपटात काम केल्यानंतर आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम केल्यानंतर तिला पुढील काही महिने चांगल्या भूमिका मिळू शकल्या नाहीत. आर्थिक अडचणींचा मितालीच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. जेव्हा पोलिसांनी मिताली शर्माला अटक करून पोलिस स्टेशनला नेले तेव्हा मितालीनं सर्वात आधी जेवण मागवले होते. रिपोर्टनुसार, पोलिसांनी मितालीला ठाण्यातील मानसिक आश्रयामध्ये दाखल केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
