Miss Universe 2022: मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झालेल्या सौंदर्यवतीनं परिधान केला कचऱ्यापासून तयार केलेला ड्रेस; म्हणाली, 'कचरा वेचणाऱ्या पालकांसोबत गेले बालपण'
एन्ना सुएंगम-आयएमनं (Anna Sueangam-iam) मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या एका राऊंडमध्ये कचऱ्यापासून तयार करण्यात आलेला ड्रेस परिधान केला होता.
Miss Universe 2022: अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही 'मिस युनिव्हर्स-2022' (Miss Universe 2022) या स्पर्धेची विजेती ठरली. 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे झालेल्या समारंभात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धाच्या विजेतीची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत एन्ना सुएंगम-आयएमनं देखील सहभाग घेतला होता. एन्ना सुएंगम-आयएमनं (Anna Sueangam-iam) मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या एका राऊंडमध्ये कचऱ्यापासून तयार करण्यात आलेला ड्रेस परिधान केला होता.
एन्ना सुएंगम-आयएमनं ड्रिंक कॅनची एल्युमिनियमची झाकणं आणि इतर काही टाकावू वस्तूंपासून तयार केलेला ड्रेस मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या एका राऊंडमध्ये परिधान केला होता. एन्ना सुएंगम-आयएमनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या ड्रेसबाबत सांगितलं.
एन्ना सुएंगम-आयएमची पोस्ट
एन्ना सुएंगम-आयएमनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती टाकावू वस्तूंपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या स्टेजवर उभी राहिलेली दिसत आहे. या व्हिडीओला एन्ना सुएंगम-आयएमनं कॅप्शन दिलं, 'हा गाऊन माझ्या बालपणापासून प्रेरित होऊन तयार केला आहे. कचरा वेचणाऱ्या पालकांसोबत माझे बालपण गेले. तसेच कचऱ्याच्या ढिगांमध्ये आणि रिसायकलिंगमध्ये मी वाढलेली आहे. हा अनोखा गाऊन आहे. 'कॅन टॅब' सारख्या टाकून दिलेल्या आणि रिसायकल केलेल्या वस्तूंपासून तयार केलेला आहे, जे अनेकांना निरुपयोगी मानले, त्यामध्ये स्वतःचे मूल्य आणि सौंदर्य आहे, हे या ड्रेसच्या माध्यामातून जगामसोर सादर केले.'
पाहा फोटो
View this post on Instagram
'मिस युनिव्हर्स-2022' या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन्स सहभागी झाल्या होत्या. भारताची दिविता राय टॉप 16 मध्ये पोहोचली पण टॉप-5 मध्ये तिला स्थान मिळाले नाही. आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला आहे. भारताच्या हरनाज संधूनं यावेळी आर बोनी गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Miss Universe 2022: अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएल ठरली 'मिस युनिव्हर्स-2022' ची विजेती