Rijul Maini : भारतीय वंशाची रिजुल मैनी ठरली 'Miss India USA 2023'! 25 राज्यांच्या 56 सौंदर्यवतींवर केली मात
Miss India USA 2023 : 25 देशांच्या 56 सौंदर्यवतींवर मात करत भारतीय वंशाची रिजुल मैनीने (Rijul Maini) 'मिस इंडिया यूएसए 2023'चा मान पटकावला आहे.
Miss India USA 2023 Rijul Maini : भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने (Rijul Maini) 'मिस इंडिया यूएसए 2023'चा (Miss India USA 2023) मान पटकावला आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्याने रिजुल मैनी सध्या चर्चेत आहे. जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'मिस इंडिया यूएसए 2023' या 41 व्या स्पर्धेत अमेरिकेतील 25 पेक्षा अधिक राज्यांनी भाग घेतला होता. भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत रिजुल मैनीने बाजी मारली आहे. 25 राज्यांच्या 56 सौंदर्यवतींवर तिने मात केली आहे. वर्जीनियाची ग्रीष्टा भट पहिली उपविजेती ठरली आहे. तर नॉर्थ कैरालिनाची इशिता पाई रायकर दुसरी उपविजेती ठरली आहे.
'मिस इंडिया यूएसए 2023' ही स्पर्धा जिंकल्यानंतर रिजुल मैनी म्हणाली,"मिस इंडिया यूएसए 2023' ही स्पर्धा जिंकल्याचा मला नक्कीच आनंद आहे. त्याबद्दल मी आभारही व्यक्त करते. आई-वडील आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय हे काहीही शक्य नव्हतं. मिशिगन पेजेंटचे दिग्दर्शक आणि माझ्या मित्रांनी या प्रवासात मला मोलाची साथ दिली आहे". रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023' या स्पर्धेदरम्यानचे फोटो शेअर करत एक खास पोस्टदेखील शेअर केली आहे. तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका स्पर्धेमुळे डॉक्टर होणारी रिजुल रातोरात सुपरस्टार झाली आहे.
View this post on Instagram
रिजुल मैनी कोण आहे? (Who is Rijul Maini)
रिजुल मैनी ही 24 वर्षीय भारतीय वंशाची अमेरिकन वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सर्जन होण्याची रिजुलची इच्छा आहे. महिलांसाठी एक रोल मॉडल होण्याचीदेखील तिची इच्छा आहे. अनेक सामाजिक कार्यक्रमांसोबत ती जोडली गेली आहे.
57 सौंदर्यवतींचा होता सहभाग
'मिस इंडिया यूएसए 2023' या स्पर्धेत 25 राज्यांतील 57 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस इंडिया यूएसए, मिसेज इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए अशा तीन विभागांत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहाभागी झालेल्या सौंदर्यवतींना विमानाचे तिकीट मोफत देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या