Me Vasantrao : 'सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला'... अनिता दातेची पोस्ट चर्चेत
Me Vasantrao : 'मी वसंतराव' सिनेमावर भाष्य करणारी अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Me Vasantrao : मी वसंतराव (Me Vasantrao) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे प्रेक्षकांसह समीक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सिनेमात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमा संदर्भातील अनिता दातेची (Anita Date) फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अनिता दातेने लिहिले आहे,"मी वसंतराव' हा आमचा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. या सिनेमात मला पंडित वसंतराव देशपांडे यांच्या कणखर आईची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. तुम्ही या कामाचे, आमच्या सिनेमाचे भरभरून कौतुक करीत आहात. तुम्हा सर्वांच्या या दिलखुलास प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार! अजुनही ज्यांनी हा सिनेमा बघितलेला नाही त्यांनी नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.
तुमचं हे प्रेम आमचा उत्साह नेहमी वाढवत राहील".
View this post on Instagram
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य आणि सांगितिक प्रवास 'मी वसंतराव' या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट म्हणजे 'मी वसंतराव' हा सिनेमा आहे. सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन निपुन धर्माधिकारीने केले आहे
संबंधित बातम्या