एक्स्प्लोर
पुन्हा एकदा राणी ‘शिवानी शिवाजी रॉय’च्या भूमिकेत, ‘मर्दानी2’चा फर्स्ट लूक रिव्हील
मर्दानी2 या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक गोपी पुथरन करणार आहेत. तर राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे. 2019 च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा बोललं जात आहे.

मुंबई : सफेद शर्ट, काळी पॅन्टं आणि ‘मर्दानी’ लूक घेऊन अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘मर्दानी2’ या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी ही पुन्हा एकदा महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्मने ट्विट करत राणी मुखर्जीच्या या नव्या लुकची माहिती चाहत्यांना दिली. तसेच ‘मर्दानी2’ या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु झाल्याचंही त्यात सांगितलं. चित्रपटात राणी मुखर्जी 21 वर्षीय खलनायकांसह युद्ध करणार असल्याचेही बोलले जात आहे.
2014 साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट आला. या चित्रपटात पोलिसाची भूमिका बजावलेल्या राणीला प्रेक्षकांकडून खूप दाद मिळाली. लहान मुलींची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेतील राणीने सगळ्यांची मनं जिकंली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. म्हणूनच या चित्रपटाचा सिक्वल आणण्याचा विचार यशराज फिल्मनं केला आहे. मर्दानी2 या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक गोपी पुथरन करणार आहेत. तर राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे. 2019 च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा बोललं जात आहे.#RaniMukerji starts shooting for #Mardaani2 | @Mardaani2 pic.twitter.com/RN31v5sVWZ
— Yash Raj Films (@yrf) March 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
