Marathi Movies : 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' बॉक्स ऑफिस आमने-सामने; प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका
Marathi Movies : 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' हे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत.
![Marathi Movies : 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' बॉक्स ऑफिस आमने-सामने; प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका Marathi Movies De Dhakka 2 and Ekda Kay Zala box office Clash Double blast of entertainment for the audience Marathi Movies : 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' बॉक्स ऑफिस आमने-सामने; प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/13/4eb2d703d321c5cae8dd3bf1f8b7d5af1657729325_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ekda Kay Zala And De Dhakka 2 Box Office Clash : कोरोनानंतर अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. अशातच दोन बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. 'दे धक्का 2' (De Dhakka 2) आणि 'एकदा काय झालं' (Ekda Kay Zala) हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत.
'दे धक्का 2' सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
आषाढी एकादशीचं निमित्त साधून 10 जुलैला 'दे धक्का 2' सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा सिनेमा 5 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षकांना 'दे धक्का 2'ची उत्सुकता आहे.
'एकदा काय झालं' प्रेक्षकांसाठी पर्वणी
डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं' हा सिनेमादेखील पाच ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला 'एकदा काय झालं' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या सिनेमात अभिनेता सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे. तर मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका
'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजेच 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दोन्ही सिनेमांसाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. एकीकडे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका मिळणार असून सर्वसामान्यांचा खिशाला कात्री बसणार आहे. प्रेक्षक कोणता सिनेमा पाहायला पसंती दर्शवतात याकडे सध्या निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या
De Dhakka 2 : ‘आज पंढरीची वारी, 5 ऑगस्टला लंडनवर स्वारी!’, ‘दे धक्का 2’चं नवं पोस्टर पाहिलंत का?
Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सुमीत राघवन मुख्य भूमिकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)