एक्स्प्लोर

Telly Masala : मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न ते 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Year Ender 2023 : गौतमी पाटील, साईराज केंद्रे अन् आजाओ दिखादूँगा म्हणत व्हायरल झालेला पठ्ठ्या; यंदाच्या वर्षात 'या' मराठमोळ्या व्यक्तींना सोशल मीडियामुळे मिळाली प्रसिद्धी

Viral Stars of 2023 : भारतीय मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया (Social Media) वापरतात. फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) आणि इंस्टाग्राम (Instagram) यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) भारतात (India) खूप लोकप्रिय आहेत आहे. अनेक जण काही सोशल मीडियाचा वापर संपर्कासाठी करतात तर काही जण व्हिडीओ आणि रील पाहण्यासाठी करतात. काहीजण स्वतःचे व्हिडीओ बनवून प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना सोशल मीडियामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. ज्यांना काही महिन्यांपूर्वी लोक ओळखतही नव्हते, ते लोक सोशल मीडियामुळे राजोरात स्टार झाले आणि संपूर्ण देश त्यांना ओळखू लागला आहे. आज आम्ही अशा सोशल मीडिया स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी 2023 हे वर्ष खूप खास होतं. यावर्षी या व्यक्तींना इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आणि जे रातोरात देशातील घराघरांत पोहोचले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gautami Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा  प्रेक्षकांना घायाळ करतात. गौतमी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मला देखील आरक्षण हवंय" असंही तिनं यावेळी सांगितलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2 : "अन् मैत्रीचा सोहळा होतो"; मनाला भावुक करणारा 'झिम्मा 2'चा नवा ट्रेलर आऊट

Jhimma 2 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय, गाणी, दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशातच आता या बहुचर्चित सिनेमाचा नवा ट्रेलर आऊट झाला. 'झिम्मा 2'चा नवीन ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Songya : स्त्रीशक्तीचा जागर करणारा 'सोंग्या' प्रदर्शनासाठी सज्ज; ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत

Songya Marathi Movie : 'मुलगी शिकली प्रगती झाली' अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या माध्यमातून अगदी हलक्या-फुलक्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिलिंद इनामदार दिग्दर्शित 'सोंग्या' (Songya) हा सिनेमा 15 डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Actors New House : सई ताम्हणकर ते पृथ्वीक प्रताप; सरत्या वर्षात 'या' मराठी कलाकारांचं पूर्ण झालं घराचं स्वप्न

Marathi Actors New House : स्वत:चं घर होणं हे सर्वसामान्यांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेकांचं स्वप्न असतं. सरत्या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सई ताम्हणकरपासून (Sai Tamhankar), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ते पृथ्वीक प्रतापपर्यंत (Prithvik Pratap) अनेक सेलिब्रिटींचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget