Telly Masala : मासिक पाळीत काय करायचं? निवेदिता सराफ यांचा सवाल ते तेजस्विनी पंडीतचं 'ते' वक्तव्य चर्चेत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Tejaswini Pandit : मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घालावी का? तेजस्विनी पंडीत म्हणाली,"स्विमिंग पूलमध्ये घालणार नाही मग कुठे?"
Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिकिनी घालण्यावरुन अनेकदा मराठमोळ्या अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. आता यावर तेजस्विनी पंडीतने आपलं मत मांडलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Dharmaveer 2 : साक्षात आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात तेव्हा; धर्मवीरांच्या रुपात प्रसाद ओकने केली अष्टमीची आरती
Dharmaveer 2 : ठाण्यातील टेंभीनाका येथे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला यंदा अयोध्यातील राम मंदिरची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते ठाण्यातील पहिली चांदीची विट अयोध्यातील राम मंदिरासाठी देण्यात आली होती. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. आता ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन घेत प्रसाद ओकने 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nivedita Saraf : मासिक पाळीत काय करायचं? नाट्यगृहाच्या अवस्थेवर निवेदिता सराफ संतापल्या
Nivedita Saraf : अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सध्या या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. नाटक, सिनेमे, आणि मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करीत आहेत. दरम्यान मासिक पाळीत काय करायचं? असा प्रश्न उपस्थित करत नाट्यगृहाच्या अवस्थेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prajakta Mali : "नाव 'आदिती' असल्याने..." प्राजक्ता माळीनं खास पोस्ट शेअर करु केलं आदिती तटकरेंचं कौतुक
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. प्राजक्ता ही अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावते. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये प्राजक्ताची भेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यासोबत झाली. या कार्यक्रमामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन प्राजक्तानं आदिती तटकरे यांचे कौतुक केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Appi Aamchi Collector : अप्पीच्या अर्जुनची कौतुकास्पद कामगिरी; लेकीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता अप्पीच्या अर्जुनने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. अर्जुनने लेकीचा वाढदिवस हटके अंदाजात साजरा केला आहे.