(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nivedita Saraf : मासिक पाळीत काय करायचं? नाट्यगृहाच्या अवस्थेवर निवेदिता सराफ संतापल्या
Nivedita Saraf : नाट्यगृहाच्या अवस्थेवर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी संताप व्यक्त केला आहे.
Nivedita Saraf : अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) सध्या या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. नाटक, सिनेमे, आणि मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करीत आहेत. दरम्यान मासिक पाळीत काय करायचं? असा प्रश्न उपस्थित करत नाट्यगृहाच्या अवस्थेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी स्त्रियांच्या अडचणी, विविध शहरांमधील नाट्यगृहाची परिस्थिती यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या,"नाट्यगृहांची परिस्थिती काहीही बदललेली नाही. नाट्यगृहांमध्ये साधा कचऱ्याचा डब्बादेखील नसतो. गेल्या काही वर्षांपासून आजही या समस्येचा महिला कलाकारांना सामना करावा लागत आहे. अनेक नाट्यगृहांत आजही टॉयलेट नाहीत. मग महिला कलाकारांनी मासिक पाळीदरम्यान काय करायचं?".
View this post on Instagram
निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या,"व्हिलचेअरवर असणाऱ्या व्यक्तीला जर नाटक पाहायचं असेल तर किती नाट्यगृहांमध्ये तशी सुविधा आहे? नाट्यगृहांमध्ये शासकीय कार्यक्रम होत असतात. आजची नाट्यगृह एखाद्या प्रायव्हेट ट्रस्टला देण्याची गरज आहे.
वहिदा रेहमान यांनी भूमिका द्या : निवेदिता सराफ
वहिदा रेहमान यांचा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. दरम्यान निवेदिता सराफ यांनी ज्येष्ठ अभिनेत्रींना काम न मिळण्याबद्दल भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या,"वहिदा रेहमान यांचा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अर्थात देशासाठी ही अभिमानास्पद गोष्ट होती. पण त्यांना फक्त पुरस्कार देऊन चालणार नाही. त्यांना कामही मिळायलं हवं. चांगल्या भूमिका मिळायल्या हव्या".
निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. अनेक कलाकृतींमध्ये त्यांनी दर्देदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच 'मी स्वरा आणि ते दोघे' या नाटकाचे प्रयोगही त्या करत आहेत.
अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील निवेदिता सराफ यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. निवेदिता सराफ यांनी बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्या सरखे आम्हीच, बनवाबनवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निवेदिता सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळत असते. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या