Telly Masala: मराठा आरक्षणाबाबत हेमंत ढोमेचं ट्वीट ते अशोक सराफ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ankita Walawalkar : उन्माद आणि अहंकार, उथळ अंकिताचा खळखळाट फार, प्रसिद्धी डोक्यात, नेटकरी काय काय म्हणाले?
Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. अंकितावर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत आहे. अंकिता वालावलकरला ज्या सोशल मीडियाने मोठं केलं तोच सोशल मीडिया अंकिताला आरसा दाखवत आहे. अंकिताच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेली असून, तिला अहंकार आला आहे, अशा शब्दात नेटकरी अंकितावर बरसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
अशोक सराफ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण; चाहत्यांनी दिली आगळीवेगळी भेट
Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या चर्चेत आहेत. अशोक सराफ यांच्या चहात्यांनी त्यांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे. अशोक सराफ यांचे फोटो असलेल्या टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा भांडुप येथे पार पडला. भारत सरकारच्या टपाल विभागातून माय स्टॅम्प योजनेअंतर्गत अभिनेते अशोक सराफ यांचा फोटो असलेलं तिकीट त्यांना देण्यात आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Hemant Dhome: "अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..."; मराठा आरक्षणाबाबत हेमंत ढोमेचं ट्वीट
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. अनेक लोक मनोज जरांगे यांना प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत. अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट शेअर करत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत एक ट्वीट शेअर केलं होतं. आता अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून हेमंतनं, ' महाराष्ट्र अशांत होता कामा नये!', असं सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Manoj Jarange : "मराठ्यांना हक्काचं आरक्षण हवंय", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य
Ashwini Mahangade On Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला (Maratha Reservation) राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील (Ashwini Mahangade) या आंदोलनात सहभागी झाली आहे. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे, असं मत अश्विनी महांगडेने मांडलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Boyz 4 Box Office Collection: "बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार!; 'बॉईज 4' नं दहा दिवसांत कमावले ‘एवढे’ कोटी
Boyz 4 Box Office Collection: बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 या चित्रपटांच्या यशानंतर बॉईज-4 (Boyz 4) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटामधील गाणी, चित्रपटामधील संवाद तसेच चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली.'बॉईज 4' चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले. 'बॉईज 4' चित्रपट रिलीज होऊन आता दहा दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...