Manoj Jarange : कर्म मराठा, धर्म मराठा, मराठ्यांचा नवीन सरदार; 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Manoj Jarange : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
Manoj Jarange : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची टीम आज प्रमोशनसाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांचा यश नव्हे, तर संघर्ष सर्वांसमोर आणायचं आहे. जरांगे पाटील फक्त लाठीचार्ज मुळे मोठे झाले नाहीत, तर त्याआधी ही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते, हेच राज्याच्या समोर आणायच्या उद्दिष्टाने "संघर्ष योद्धा" चित्रपट तयार केला. 21 जूनला फक्त मराठा समाजाचे नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा, अशी भावना 'संघर्ष योद्धा' चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली.
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकारसोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्ष योद्धा' चित्रपट 21 जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने विदर्भात चित्रपटाचे प्रमोशन केले.
View this post on Instagram
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
आम्हाला जरांगे पाटील यांचं यश नव्हे, तर त्यांचा संघर्ष सर्वांसमोर आणायचं आहे. मनोज जरांगे पाटील फक्त लाठीचार्जमुळे मोठे झाले नाहीत, तर त्या घटनेच्या आधीही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते आणि तीच गोष्ट राज्याच्या समोर आणायच्या उद्दिष्टाने हे चित्रपट तयार करण्यात आल्याची भावना चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणाऱ्या रोहन पाटील यांनी व्यक्त केली. तर जरांगे पाटील यांनी शून्यातून इतिहास घडवला आहे, हे सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करत असल्याची भावना संघर्ष योद्धा चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी व्यक्त केली.
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी असणार आहे.
संबंधित बातम्या