Mani Ratnam: मणिरत्नम यांचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग
मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. मणिरत्नम यांच्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
Mani Ratnam’s Top 10 highest-rated Movies on IMDb : मणिरत्नम (Mani Ratnam) हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्यालम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पद्मश्री पुरस्कार विजेते दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा, बॉम्बे, इरूवर, दिल से आणि कन्नाथील मुथामित्तल या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. मणिरत्नम यांच्या एका आगामी चित्रपटात अभिनेते कमल हसन हे काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. हा 2024 मध्ये प्रदर्शित होईल, असंही म्हटलं जात आहे. मणिरत्नम यांचा शुक्रवारी (2 जून) 67 वा वाढदिवस आहे. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. मणिरत्नम यांच्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
IMDb वरील मणिरत्नम यांचे सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 चित्रपट:
नायकन (Nayakan) - 8.6
थलापती (Thalapathy) - 8.5
कन्नाथील मुथामित्तल (Kannathil Muthamittal)- 8.4
इरूवर (Iruvar) - 8.4
मौना रागम (Mouna Raagam)- 8.4
अलाईपेयुथे - 8.3
गीतांजली - 8.3
अंजली (Anjali)- 8.2
बॉम्बे (Bombay) - 8.1
रोजा - 8.1
मणिरत्नम यांच्या रोजा आणि बॉम्बे या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यामधील बॉम्बे हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला तर रोजा हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन-2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. पोन्नियिन सेल्वन हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे.
View this post on Instagram
मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन-2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), चियान विक्रम (Vikram), कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala), आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: