Manasi Naik Divorce : मोठी बातमी! मानसी नाईकचा घटस्फोट; पतीपासून विभक्त होताच शेअर केला व्हिडीओ
Manasi Naik : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकचा घटस्फोट झाला आहे. पतीपासून विभक्त झाल्यावर तिने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

Manasi Naik : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईकच्या (Manasi Naik) घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर अभिनेत्रीचा घटस्फोट (Manasi Naik Divorce) झाला आहे. पतीपासून विभक्त झाल्यावर अभिनेत्रीने स्वत: व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
मानसी नाईक व्हिडीओ शेअर करत म्हणाली,"आयुष्यात आलेले अडथळे दूर झाले आहेत आणि आता नव्या जोमाने, नव्या रुपात मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली आहे. कोणत्याच कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं. ते पब्लिक असतं. माझा चाहतावर्ग खूप भावनिक आहे. याचा मी जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या नव्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे".
"अखेर माझा घटस्फोट झाला आहे" : मानसी नाईक
मानसी नाईक म्हणाली,"एक स्त्री म्हणून या जगात जगायचं असेल तर काही गोष्टी स्पष्टपणे बोलायला हव्यात असं मला वाटतं. लाज वाटेल असं मी कधीच काही करत नाही. अखेर माझा घटस्फोट झाला आहे. तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आता मी अधिकृतरित्या मानसी नाईक आहे. मी हरले नाही तर जिद्दीने समाजात वावरायला आता सज्ज आहे. कलाकार म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे गोष्टी लपवला येत नाही. चुका आमच्याकडूनही होता. आता आनंदाने नवा प्रवास सुरू करायला मी सज्ज आहे".
मानसी नाईक पुढे म्हणाली," हार माणू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. कोणताही अन्याय सहन करायचा नाही. चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य खराब करायचं नाही. आई-वडील आपल्याकडे विश्वासाने पाहत असतात. प्रत्येक दिवस हा नवीन असतो. गणपती बाप्पा, तुळजाभवानी आणि माझ्या स्वामींनी माझी साथ कधीच सोडली नाही. या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात करते आहे. तुमचा आशीर्वाद तुमचा प्रतिसाद खूप मुलाचा आहे. तसं मी नेहमीच म्हणते की मी तुमचीच आहे".
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी ते लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मानसीच्या 'बाई वाड्यावर या', 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मानसी तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
संबंधित बातम्या
Manasi Naik : 'बघतोय रिक्षावाला...' फेम मानसी नाईकचा घटस्फोट? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
