एक्स्प्लोर
मलायका अरोरा-अरबाजचा परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज
मुंबई : बॉलिवूडमधील हॉट कपल अशी ओळख असलेलं मलायका अरोरा आणि अरबाज खाननं अखेर विभक्त होत आहे. वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये कुरबुरी सुरु असल्यानं घटस्फोटाची चर्चा सुरु होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघं पुन्हा एकत्र पाहायला मिळाल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. परंतु आता दोघांनीही परस्पर सामंजस्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
मलायकाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या 18 वर्षांचा सुखी संसार संपुष्टात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी मलायका खान कुटुंबाच्या 'गॅलक्सी'तील घराला राम राम ठोकून मुलांसोबत खारमधील अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेली होती. याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते. मात्र ती बहिणीकडे गेली नाही.
इतकंच नाही तर मलायका अमृताच्या दुबईतील बर्थ डे पार्टीलाही गेली नव्हती. या पार्टीला अरबाज आल्यामुळेच मलायका गेली नव्हती. याशिवाय नणंद म्हणजे सलमानची बहिण अर्पिताच्या डोहाळे जेवण समारंभालाही उपस्थित राहिली नव्हती.
सलमानकडून पॅच अपचा प्रयत्न
अरबाज आणि मलायका एकमेकांपासून दुरावत असल्याची बातम्या आल्यानंतर, त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी सलमान खान मदत करत होता. सलमानने यासाठी 2 मार्चला फॅमिली पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला त्याने बहिण अमृता आणि तिचा पती, मलायकाची आई, तसंच मलायकांचे जवळचे नातेवाईक शकील लडाक यांना आमंत्रित केलं होतं. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
यानंतरही सलमानने जिद्द सोडली नव्हती. त्याने कलर्स गोल्डन अवॉर्डमध्येही मलायकाच्या बाजूला बसून चर्चा केली होती.
सलीम खान यांचा हस्तक्षेप नाही
अरबाज आणि मलायकाच्या दुराव्याबाबत वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांनी बोलणं टाळलं "मी एक लेखक आहे. मला कोणाच्याही लव्ह-अफेअर आणि ब्रेकअप विषयी विचारु नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करत नाही," मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं सलीम खान म्हणाले.
तर मलायकाची आई जोएस पॉलिकॉर्प यांनी तुटणाऱ्या नात्याविषयी बोलणं टाळलं. दोघेही समजूतदार आहे आणि हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मला त्यांच्यात पडायचं नाही. शिवाय यासंदर्भात मीडियाशीही बोलायचं नाही, असं जोएस पॉलिकॉर्प म्हणाल्या.
अरबाज-मलायकाची प्रेमकहाणी
मलायका 18 वर्षांची होती, तेव्हा ती अरबाजला पहिल्यांदा भेटली होती. एका जाहिरातीच्या शुटिंगच्या निमित्ताने 1992 साली दोघांची पहिली भेट झाली. या जाहिरातीनंतर दोघेही प्रेमात पडले. पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लगीनगाठ बांधली.
“मलायकावर खूप प्रेम करतो – अरबाज
यापूर्वी मलायकासोबतच्या टेलिव्हिजन शो ‘यार मेरा सुपरस्टार’मध्ये अरबाज म्हणाला होता, “असं असतं की, जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळवायचं असतं, तेव्हा ते गमावण्याची तुम्हाला भीती वाटत असते. मी मलायकावर खूप प्रेम करतो, मात्र तिला गमावण्याची भीती वाटते.”
संबंधित बातम्या
सलमानची मध्यस्तीही वाया, मलायका-अरबाजचा घटस्फोट निश्चित?
अरबाज खान-मलायका अरोरा यांचा घटस्फोट होणार?
“मलायकावर खूप प्रेम करतो, तिला गमावण्याची भीती वाटते”
सोहेल खान आणि पत्नी सीमाचं ऑल इज नॉट वेल?
अभिनेत्री हुमा कुरेशीमुळे सोहेल खानचं वैवाहिक आयुष्य धोक्यात?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement