Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिरयानी'नावात दडलंय काय? साऊथ चित्रपट का ठरतायत हिट? नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे भरभरुन बोलले
अभिनेता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर चर्चा केली.
Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाच्या नावाबद्दल तसेच साऊथ चित्रपसृष्टीबद्दल दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा केली. यावेळी 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाच्या नावाबद्दल नागराज म्हणाला, 'काल हा चित्रपट रिलीज झालाय. ही फिल्म नावासारखीच आहे. या चित्रपटाची कथा हेमंत आवताडेची आहे. हेमंत जेव्हा माझ्याकडे ही गोष्ट घेऊन आला, तेव्हा त्या गोष्टीमध्ये फक्त बिरयाणी होती. नंतर आम्ही दोघांनी ही गोष्ट लिहिण्यास सुरुवात केली.तेव्हा लक्षात आलं की या कथेला घर बंदूक बिरयानी हेच असावं. लोकांना हे काही तरी नवं वाटत आहे. चित्रपटाचं नाव आणि चित्रपटाचा आशय या दोन्ही गोष्टी नव्या आहेत. त्यामुळे नव्या आशयाला नवं दिलं आहे.'
'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाबद्दल सायाजी शिंदे म्हणाले, 'मला वाटतं की, घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या माध्यामातून नागराज हा एक स्टेप पुढे गेला आहे. प्रत्येक कलावंताकडे एक जॉनर असतो. या चित्रपटामधून त्याला नवा जॉनर सापडला आहे.
'माझी ही फिल्म करायची इच्छा नव्हती , पण मी या कथेबाबत विचार करावा अशी माझ्या भावाची आणि हेमंतीची इच्छा होती. त्यानंतर आम्ही कथा लिहायला घेतली. हा चित्रपट लिहिताना मला वाटलं की सया दादानं या चित्रपटात भूमिका साकारावी.अशा प्रकारचे चित्रपट आपण करायला पाहिजेत.'
साऊथ चित्रपटांच्या यशाबद्दल काय म्हणाला नागराज?
नागराजनं साऊथ चित्रपटांबद्दल सांगितलं'गोदावरी, मी वसंतराव सारखे चित्रपट आपल्याकडे झाले पण लोकं चांगले चित्रपट बघत नाही, पण साऊथ चित्रपट महाराष्ट्रात हिट होतात.आपल्याकडे समकालीन गोष्टी लोकांना आवडतं नाहीत. जसं की लोकांना अरिजीत सिंह नाही तर दुसरा कुठला तरी इंग्रजी गायक आवडतो. अनेकांना समकालीन अभिनेता आवडत नाही, जुना कोणतातरी अभिनेता आवडतो. आपण साऊथ चित्रपटांचे VFX आपण बघतो. आपल्याकडे आयडिया आहेत पण त्यासाठी पैसे हा मुद्दा येतो. जिथे पैसे आहेत तिथे आयडिया नाहीये.
सायाजी शिंदे हे साऊथ चित्रपटसृष्टीबाबत म्हणाले,'आपल्याकडे स्टारिजम नाही. दिग्दर्शक म्हणून जो स्टारिजम असावा तो आपल्याकडे फक्त दोघा- तिघांकडेच आहे. नागराज हा आता मराठी चित्रपटसृष्टीला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, हे तुम्हाला घर बंदूर बिरयानीमध्ये दिसेल. साऊथ चित्रपटांमधील फायटिंग आपल्या लोकांना आवडते. पण इकडे तसं केलं तर लोक म्हणतात बघा कॉपी करायला लागले. लोक दोन्ही बाजूनं बघतात पण आपण पण आपल्या चित्रपटांचा रिस्पेक्ट केला पाहिजे.'
इतर महत्वाच्या बातम्या: