Main Atal Hoon : करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी! पंकज त्रिपाठींचा 'मैं अटल हूँ' ओटीटीवर होणार रिलीज
Main Atal Hoon : पंकज त्रिपाठी (Pankaj tripathi) अभिनीत 'मैं अटल हूँ' हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Main Atal Hoon : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आता हा सिनेमा 'झी 5' (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'मैं अटल हूँ' ओटीटीवर कधी रिलीज होणार? (Main Atal Hoon OTT Release)
पंकज त्रिपाठी अभिनीत 'मैं अटल हूँ'चे दिग्दर्शन मराठमोळ्या रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलं आहे. 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 14 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 14 मार्चपासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे.
'मैं अटह हूँ' या सिनेमात अष्टपैलू, राष्ट्रीय पारितोषिक-प्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते फिल्ममेकर रवी जाधव यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. ‘मैं अटल हूं’चे कथानक प्रेक्षकांना भारताच्या सर्वात आदर्श आणि नामवंत नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अद्वितीय प्रवास आणि वारसा उलगडेल.
View this post on Instagram
'मैं अटल हूँ'मध्ये काय पाहायला मिळेल? (Main Atal Hoon Movie Details)
डिसेंबर 2014 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, चार दशकांहून अधिक कालावधीच्या बहारदार राजकीय प्रवासाचा मागोवा 'मैं अटल हूँ' मध्ये घेण्यात आला आहे. 21 व्या शतकात जागतिक नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेल्या भारताचा पाया अटलजींनी तयार केला. कारण त्यांनी जगात भारताला इतक्या उंचीवर नेले की हा बदल अपरिवर्तनशील ठरला. वाजपेयींचा वारसा सध्या आणि भविष्यातील राजकीय नेत्यांसाठी मार्गदर्शनपर प्रेरणा म्हणून काम करत आहे. कारण त्यांचा साधेपणा आणि सचोटी, प्रतिष्ठा आणि सहानुभूती तसेच लाभलेल्या पदाशी वैयक्तिक अनासक्ती यामुळे ते युवकांच्या राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत बनले.
इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी संसदेत बैलगाडीवर येण्यापासून ते संयुक्त राष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेपर्यंत, वाजपेयी एक असा राजकीय वारसा मागे सोडून गेले आहेत, ज्याचा विरोध फार कमी लोक करतात. भारताच्या धोरणात्मक विचारांवर अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव निर्णायक आणि अपरिवर्तनीय होता. भारताला जगाच्या अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत आणणे, दूरसंचार क्रांतीची स्थापना करणे, कारगिल युद्ध यशस्वीरित्या संपवून जिंकण्याच्या देशसंबंधी अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
'मैं अटल हूँ'बद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले,"आपल्या देशाची यशस्वी पायाभरणी करणाऱ्या देशातील सर्वात नामवंत नेत्यांपैकी एकाची भूमिका वठवण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खरा सन्मान होता. मला अटलजी आणि त्यांच्या उल्लेखनीय राजकीय प्रवासाची जाणीव होतीच, मात्र या सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांच्या जीवनातील आणखी अनेक प्रेरणादायी गुण आणि पैलूंची ओळख करून घेता आली".
संबंधित बातम्या