एक्स्प्लोर

Maherchi Sadi : 'माहेरची साडी' सिनेमासाठी अलका कुबल यांनी किती मानधन घेतलं होतं? जाणून घ्या...

Maherchi Sadi : 'माहेरची साडी' या सिनेमाच्या तिकीटाची किंमत फक्त चार रुपये होती.

Maherchi Sadi Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान प्रेक्षकांना 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) या ब्लॉकबस्टर सिनेमाची आठवण येत आहे. 'माहेरची साडी' हा सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. 

'माहेरची साडी' या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके (Vijay Kondke) यांनी सांभाळली होती. तसेच त्यांनीच या सिनेमाची निर्मिती केली होती. त्याकाळी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता. रिलीजच्या तीन महिन्यांत या सिनेमाने 12 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा 'माहेरची साडी' ठरला होता. 

'माहेरची साडी' सिनेमाच्या तिकीटाची किंमत किती होती? (Maherchi Sadi Ticket Price)

'माहेरची साडी' हा सिनेमा 'बाई चली ससरीये' हा राजस्थानी सिनेमाचा मराठी रिमेक होता. त्यानंतर 1994 मध्ये या सिनेमाचा हिंदी रिमेकही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात जुही चावला आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. 12 कोटींची कमाई करणाऱ्या 'माहेरची साडी' या सिनेमाचं प्रत्येकी तिकीट फक्त चार रुपये होतं. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा आहे.

'माहेरची साडी' सिनेमासाठी अलका कुबल यांनी किती मानधन घेतलं होतं? (Alka Kubal Fees Maherchi Sadi)

'माहेरची साडी' या सिनेमासाठी अलका कुबल (Alka Kubal) यांनी किती मानधन घेतलं होतं हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पण 'माहेरची साडी' हा सिनेमा करण्यासाठी अलका कुबल यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी त्यांना मिळत असलेल्या मानधनाच्या निम्म्या मानधनाहून कमी मानधन विजय कोंडके यांनी त्यांना दिलं होतं. कमी मानधनामुळेच अलका कुबल यांनी या सिनेमाला नकार दिला होता. पण 'माहेरची साडी'मधील लक्ष्मीचं पात्र मीच स्विकारवं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'माहेरची साडी' (Maherchi Sadi Starcast)

'माहेरची साडी' (Maherchi Sadi) हा सिनेमा तगडी स्टारकास्ट असलेला आहे. या सिनेमात अलका कुबल (Alka Kubal), अजिंक्य देव (Ajinkya Dev), आशालता बावगांवकर (Ashalata Wabgaonkar), रमेश भाटकर (Ramesh Bhatkar), विक्रम गोखले (Vikram Gokhale), उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि किशोरी शहाणे (Kishori Shahane) मुख्य भूमिकेत होते. आता 'माहेरची साडी 2'ची (Maherchi Sadi 2) चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

माहेरची साडी पुन्हा सिनेरसिकांच्या भेटीला, सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Embed widget