(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar Award: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर
यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
Lata Mangeshkar Award: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून (Ministry of Cultural Affairs) प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्वीट शेअर करुन पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे विजेते-
गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:
श्री.सुरेशजी वाडकर (2023)
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार1)श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022)
2)श्री.अशोकजी समेळ(2023)
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे विजेते...
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) November 11, 2023
गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:
श्री.सुरेशजी वाडकर (2023)
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार1)श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022)
2)श्री.अशोकजी समेळ(2023)@narendramodi @PMOIndia pic.twitter.com/GTSSMMe1JW
चित्रपट:
1) श्री चेतनजी दळवी (2022)
2) श्रीमती निशिगंधाजी वाड (2023)
किर्तन प्रबोधन:
1) श्रीमती प्राचीजी गडकरी (2022)
2) श्री. अमृत महाराजजी जोशी (2023)
वाद्य संगीत:
1)पं.श्री.अनंतजी केमकर (2022)
2) श्री शशिकांतजी सुरेश भोसले (2023)
कलादान:
1) श्रीमती संगीताजी राजेंद्र टेकाळडे ( 2022)
2) श्री यशवंत रघुनाथ तेंडोलकर (2023)
तमाशा:
1) श्री बुढ्ढणभाईजी बेपारी (वेल्हेकर) (2022)
2) श्रीमती उमाजी खुडे (2023)
आदिवासी गिरीजन:
1)श्री भिकल्याजी धाकल्या दिंडा (2022)
2)श्री सुरेशजी नाना रणसिंग (2023)