एक्स्प्लोर
माधुरीसाठी 85 वर्षाच्या आईने बनवला स्कार्फ!
माधुरीसाठी तिच्या आईने एका खास स्कार्फ बनवला आहे. हाच स्कार्फ परिधान करुन तिने त्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला.
मुंबई : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहे. सध्या ती याच सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान तिने आपला एका नवा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
माधुरीसाठी तिच्या आईने एका खास स्कार्फ बनवला असून हाच स्कार्फ परिधान करुन तिने त्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘माझ्या 85 वर्षाच्या आईने हा सुंदर स्कार्फ खास माझ्यासाठी तयार केला आहे. आयुष्यातील तिचा हा उत्साह खरंच प्रेरणादायी आहे.’ असं तिने या फोटोसोबत म्हटलं आहे.
माधुरीच्या या फोटोला सध्या सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. दरम्यान, माधुरी सध्या तिच्या मराठी ‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं पोस्टर तिने मकरसंक्रातीच्या दिवशी ट्विटरवरुन शेअर केलं होतं. विशेष म्हणजे, एका मुलाखतीतही बोलताना तिने या सिनेमात नेहमीपेक्षा प्रेक्षकांना वेगळं पाहायला मिळेल असं सांगितलं होतं. तसेच, या सिनेमातून प्रेक्षकांना जगण्याची एक नवी दिशा मिळेल, असंही ती म्हणाली होती. संबंधित बातम्या :My mother - 85 year old, lovingly made this scarf especially for me.❤️ It’s such an inspiration to see her zest for life ???? #MaaKaPyaar #Inspiration #LifeLine ???? pic.twitter.com/sNHc3tWiC7
— Madhuri Dixit-Nene (@MadhuriDixit) January 17, 2018
माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement