एक्स्प्लोर

Madhuri Dixit : माधुरीचा 'पंचक' हिट की सुपरफ्लॉप? जाणून घ्या 'पंचक'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Panchak Movie : माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) 'पंचक' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. माधुरीचे चाहते हा सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत.

Madhuri Dixit Panchak Box Office Collection : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पंचक' या सिनेमाची निर्मिती माधुरीने केली आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची प्रतीक्षा होती. अखेर आता हा बहुचर्चित सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

'पंचक'चं कथानक काय? (Panchak Movie Story)

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची  सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार हे 'पंचक' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'पंचक'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Panchak Box Office Collection)

'पंचक' हा सिनेमा 5 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. द टॉप इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 'पंचक' सिनेमाने 25 लाखांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 28 लाख, तिसऱ्या दिवशी 30 लाख, चौथ्या दिवशी 20 लाखांची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 1.3 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पहिला दिवस : 25 लाख
दुसरा दिवस : 28 लाख
तिसरा दिवस : 30 लाख
चौथा दिवस : 20 लाख
एकूण कमाई : 1.3 कोटी 

तगडी स्टारकास्ट असलेला 'पंचक'

'पंचक' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी सांभाळली आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'पंचक'ला दिलेल्या प्रेमाबद्दल माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही 'पंचक'चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, दिग्दर्शक, कलाकार प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांना भेट देत आहेत. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर पुणे, ठाणे, दादरमधील काही चित्रपटगृहांना माधुरी दीक्षित यांनी भेट दिली. या वेळच्या प्रतिक्रिया खूप कमाल होत्या. अनेक ठिकाणी 'माधुरी, माधुरी' असा आवाज देत माधुरी दीक्षितचे जंगी स्वागत झाले. काहींनी माधुरी दीक्षित यांना नाव घेण्याची विनंतीही केली. माधुरीनेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. प्रेक्षकांनी सिनेमात प्रचंड आवडलेल्या काही सीन्सवर चर्चाही केली. मग तो पायात कळशी अडकण्याचा सीन असो किंवा दिलीप प्रभावळकर यांना वेगळ्या अवतारात बघून कॅरेक्टर्सची उडालेली भंबेरी असो. ओपेरा तर सिनेमाचा हायलाईट आहे आणि मुंडावळ्याचा सीन हसून हसून पोटात गोळा आणतो आणि जाता जाता एक सुंदर मेसेज देऊन जातो. एका शो दरम्यान आदिनाथ कोठारे भावुक झाला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा चित्रपट अप्रतिम झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 'पंचक'ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माधुरी दीक्षितने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit : पाच मृत्यूचा समज, अंधश्रद्धेचे 'पंचक' सोडवणार, माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं

व्हिडीओ

Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव; पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती; चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
Mumbai Pune Expressway: प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, दोन्ही हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
प्रोपिलीन टँकरबाहेरील बर्फाला ड्रायव्हरने स्पर्श केला, हात भाजले, पेरुच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीने हजारो प्रवाशांचा जीव वाचला
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Maharashtra Live blog updates: मुंबईत 10 कोटींचं सोनं वितळवून विकायला आणलं, काळबादेवीत पोलिसांनी दोघांना सापळा रचून पकडलं
Mumbai Crime News : सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईच्या काळबादेवीतुन दोघांना अटक, तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
Embed widget