एक्स्प्लोर
भाजपतर्फे पुण्यातून माधुरी दीक्षित लोकसभेच्या रिंगणात?
माधुरी दीक्षितसाठी पुण्यातील ज्या जागेचा विचार केला जात आहे, त्या जागेचं लोकसभेतील प्रतिनिधित्व सध्या भाजपचे खासदार अनिल शिरोळे करत आहेत. माधुरीला याच मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास अनिल शिरोळे यांच्या खासदारकीची विकेट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आधी शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरु लागली होती. मात्र शरद पवारांनी या चर्चेतील हवा काढून घेतल्यानंतर त्यांना पूर्णविराम मिळाला. मात्र भाजपकडून अभिनेत्री माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
माधुरी दीक्षितसाठी पुण्यातील ज्या जागेचा विचार केला जात आहे, त्या जागेचं लोकसभेतील प्रतिनिधित्व सध्या भाजपचे खासदार अनिल शिरोळे करत आहेत. माधुरीला याच मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास अनिल शिरोळे यांच्या खासदारकीची विकेट पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात 'संपर्क फॉर समर्थन' या अभियाना अंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतरही माधुरीला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या कमी नाही. राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी माधुरीला उमेदवारी देण्यासंदर्भात सुरु झालेल्या चर्चांवर भाष्य केलं. काकडे यांनी माधुरीच्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली. भाजपला विजय मिळविण्यासाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी द्यावी लागेल एवढे वाईट दिवस पक्षाला आलेले नाहीत, असं काकडे यांनी म्हटलं आहे.
भाजपला उमेदवार बदलावा लागतो, यातच त्यांचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. 'लढाईमध्ये शत्रू कोणीही असो, विजय मिळवण्यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. भाजपने उमेदवारी माधुरी दीक्षित यांना दिल्याने आमची लढाई सोपी होईल असं काही नाही. विजय मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही अतिशय नियोजनबद्धरीत्या व्यूहरचना आखत असून भाजपने उमेदवार कोणीही दिला तरी विजय काँग्रेस पक्षाचा होणार हे निश्चित आहे. भाजपकडे सक्षम उमेदवार नाही, हे यावरून अस स्पष्ट होतं' असंही मोहन जोशी म्हणाले.
लोकसभा निवडणुका अजून काही महिने दूर आहेत. पण प्रत्येक पक्ष उमेदवारी कोणाला देणार यावरुन सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement