(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhubala यांच्या 96 वर्षांच्या बहिणीला सुनेने काढलं घराबाहेर, कुणालाही न सांगता पाठवले मुंबईला
Madhubala Sister Tragic Story : 96 वर्षीय कनीज बलसारा यांना सुनेनं घरातून बाहेर काढले आहे. इतकेच नाही तर, पैसे न देता ऑकलँडवरुन मुंबईला पाठवलं.
Madhubala Sister Tragic Story : बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांची मोठी बहिण कनीज बलसारा (Kaniz Balsara) सध्या चर्चेत आहे. 96 वर्षीय कनीज बलसारा यांना सूनेनं घरातून बाहेर काढले आहे. इतकेच नाही तर, पैसे न देता ऑकलँडवरुन मुंबईला पाठवलं. सामान आणि पैशाशिवाय सूनबाई समीनाने सासूला विमानात बसवले. कनीज बलसारा यांना मुंबईला पाठवल्याची माहिती सून समीनाने त्यांच्या मुलीलाही दिली नाही. वांद्र्यात राहणारी कनीजची मुलगी परवेज हिला चुलत भावाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती. 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी आठ वाजता कनीज बलसारा मुंबईत आल्या.
कनीज बलसारा यांची मुलगी परवेज हिने Etimes च्या दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. परवेज यांनी म्हटलेय की, 17-18 वर्षापूर्वी कनीज न्यूझीलंडला गेल्या होत्या. मुलाच्या प्रेमापोटी कनीज न्यूझीलंडल गेली होती. कनीज यांचा मुलगा फारुख न्यूझीलंडमध्ये सुधारणा विभागात कार्यरत आहे. फारुक आपल्या आईची काळजी घेत होता. मात्र, सून समीना नेहमीच द्वेष करत होती. समीना सासू-सासऱ्यासाठी कधीच जेवण तयार करत नव्हती. मुलगा फारुख आई-िवडिलांसाठी जवळील हॉटेलमधून जेवण आणत होता. समीनाची मुलगीही द्वेष करत होती. इतकेच नाही तर, कनीज बलसारा यांना जबरदस्ती विमानात बसवून लावताना समीनाची मुलगीही सोबत होती.
न्यूझीलंडला माझी सारखी ये जा सुरु असती. आईही दोनवेळा भारतात आली होती. पण मागील पाच वर्षांपासून ती भारतात आली नाही. कारण फारुखने सांगितले की वय वाढले आहे, त्यामुळे उंचावर श्वासनाचा त्रास होऊ शकतो, असे परवीज म्हणाली. आठ जानेवारी रोजी भाऊ फारुख याचे निधन झाले. फारुखच्या मृत्यूनंतर समीनाचा द्वेष आणि राग आणखी वाढला, असेही परवीज म्हणाल्या.
कनीज बलसारा 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी आठ वाजता मुंबई विमानतळावर पोहचल्या. त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटीने परवीज यांना फोन करत सांगितले की, कनीज यांच्याकडे आरटीपीसीआरसाठीही पैसे नाहीत. परवीज यांनी तात्काळ पैसे पाठवले आणि कनीज यांच्यासोबतही बातचीत केली. मी जेव्हा तिला भेटले तेव्हा तिने मला आधी विचारले की, बाळा फारुख हे जग सोडून गेला ते तुला माहित आहे ना. मी त्याला कबरीमध्ये सोडून आले आहे. आता मला खूप भूक लागली आहे. तू मला काही खायला देशील का? तिचे हे बोलणे ऐकून मला मोठा धक्का बसला.' समीनाने कनीज बलसारा यांचे सर्व पैसे आणि दागिनेही घेतल्याचे परवीज यांनी सांगितले.