(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Charmme Kaur: ‘जगा आणि जगू द्या...’, ‘लायगर’ फ्लॉप होताच निर्माती चार्मी कौरने पोस्ट लिहित सोशल मीडियावरून घेतला ब्रेक!
Charmme Kaur: ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर आता चित्रपटाच्या सहनिर्माती चार्मी कौरने (Charmme Kaur) सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे.
Charmme Kaur : अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) अभिनीत पॅन इंडिया चित्रपट 'Liger' 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीजपूर्वी या चित्रपटाची खूप चर्चा झाली आणि कलाकारांनीही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. पण, रिलीज झाल्यानंतर 'लायगर' प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर आता चित्रपटाच्या सहनिर्माती चार्मी कौरने (Charmme Kaur) सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे.
'लायगर' बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर करण जोहर आणि चार्मी कौर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, चार्मी कौरने आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. करण जोहरने ‘लायगर’ची निर्मिती केली होती. करण जोहर व्यतिरिक्त तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर हिने देखील या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती.
पोस्ट लिहित घेतला सोशल मीडियावरून ब्रेक!
‘लायगर’ची निर्माती चार्मे कौर हिने 4 सप्टेंबर रोजी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात ती काही काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. तिने लिहिले की, ‘चिल करा.. मी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेत आहे. आणखी काही मोठं आणि चांगलं घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत जगा आणि जगू द्या...'
पाहा पोस्ट :
Chill guys!
— Charmme Kaur (@Charmmeofficial) September 4, 2022
Just taking a break
( from social media )@PuriConnects will bounce back 😊
Bigger and Better...
until then,
Live and let Live ❤️
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान चार्मी कौर म्हणाली होती की, तिला 'लायगर'बद्दल खूप आत्मविश्वास आहे. ती म्हणाली, '2019 मध्ये मी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरला भेटले आणि 2020 मध्ये पहिल्या शेड्यूलचे शूटिंग सुरू झाले. आरआरआर आणि पुष्पानंतर आम्हाला चित्रपट फ्लोरवर आणायचा होता, पण तसे झाले नाही. चित्रपट हिट होईल, अशी आम्हाला अपेक्षा होती.’
अवघी ‘इतकी’ कमाई
मीडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लायगर' या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये आतापर्यंत केवळ 18 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर दक्षिणेतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर काही विशेष जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात केवळ 41 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'लायगर'च्या कथेबद्दल बोलायचे तर, समीक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. हा चित्रपट एका स्ट्रीट फायटरची कथा सांगणारा आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा स्ट्रीट फायटरच्या भूमिकेत आहे, तर अनन्या पांडे त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री रम्या कृष्णाने विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय माईक टायसननेही चित्रपटात कॅमिओ केला आहे. मात्र, या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांना नवीन काही न मिळाल्याने तो फ्लॉप ठरला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: