एक्स्प्लोर
'ट्रॅजेडीकिंग' दिलीप कुमार वयाच्या 94 व्या वर्षी फेसबुकवर
मुंबई : 'ट्रॅजेडीकिंग' अशी ख्याती असलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनाही फेसबुकची भुरळ पडली आहे. वयाच्या 94 व्या वर्षी दिलीप कुमार यांनी चक्क फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे.
ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या दिलीप कुमार यांनी फेसबुकवरुन आपली तब्येत ठणठणीत असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही, तर चहा पितानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ दिलीपसाहेबांसोबत त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानोही दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या तब्येतीत चढउतार होत आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. अनेक वेळा त्यांच्या प्रकृतीबाबत विचित्र अफवाही उठत होत्या. त्यानंतर दिलीप कुमार यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक हे नवं माध्यम सुरु केलं आहे.
काही दिवसांपूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यामुळे आता दिलीपकुमारही लाईव्ह गप्पा मारणार का, याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे.
दिलीप कुमार यांची फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement