Lata Mangeshkar : 'आवाज ही पहचान हैं', मराठी कलाकारांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
Lata Mangeshkar : लता मंगेशकरांच्या जाण्याने सिनेसृष्टीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Lata Mangeshkar : अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"अनेक पिढ्यांनी तुमच्या आवाजाची जादू पाहिली आहे. तुम्ही जगभरातील अब्जावधी लोकांना प्रेरणा दिली आहे. तुम्ही देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे. लता दीदी आम्हाला तुमची आठवण येईल".
प्रार्थना बेहेरेने लता मंगेशकरांचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. तिने लिहिले आहे," नाम गुम जाएगा, चेहेरा ये बदल जायेगा,"तेरी आवाज ही पहचान हैं".
अभिनेता सुबोध भावेने शोक व्यक्त करत लिहिले आहे,"भारतरत्न लता मंगेशकर साक्षात सरस्वती देवी! तुम्ही अमर आहात दीदी! तुमचे अलौकिक आणि पवित्र सूर आयुष्यभर आम्हाला सर्व प्रसंगात सोबत करतील. तुम्हाला आणि तुमच्यातल्या कलेला मनापासून नमस्कार".
भरत जाधव यांनी लता दीदींसोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे,"पु.ल. एकदा आपल्या एका भाषणात म्हणाले होते की, या आकाशात सूर्य आहे.. चंद्र आहे.. आणि लता चा स्वर आहे..!!
दीदी तुम्ही.. तुमचा आवाज..आणि तुमच्या स्मृती अमर आहेत..! शतशः नमन "
समीर चौघुलेंनी शोक व्यक्त करत लिहिले आहे,"निशब्द... लतादीदी.. अगदी काही दिवसांपूर्वी आपण मला फोन केला होतात आणि हे कोरोनाच संकट दूर झालं की आपण नक्की माझ्या घरी या आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं...आणि आज ??? आसमंतातले लक्ष लक्ष सूर क्षणार्धात पोरके झाले...स्वरांची सरस्वती आम्हा भक्तांना पोरकी करून गेली.. जगाला जगण्याची उमेद देणाऱ्या आवाजाला काही घटका आमच्या हास्यजत्रेने हसवलय हे आम्हा सर्वांचं भाग्य....दीदी...भावपूर्ण श्रद्धांजली".
संबंधित बातम्या
किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांची जुगलबंदी 'या' रोमँटिक गाण्यांमध्ये ऐकायला मिळाली...
शब्द हिरमुसले, सूर थांबले, लता मंगेशकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी रेखासाठी गायली 'ही' सुपरहिट गाणी, आजही ती ऐकून मनाला शांती मिळते
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha