Lata Mangeshkar Award: 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर
यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर करण्यात आला आहे.
Lata Mangeshkar Award: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी ट्वीट शेअर करुन पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award 2023) हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर करण्यात आला आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासोबतच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, चित्रपट,वाद्य संगीत,कलादान,लोककला,राज्य सांस्कृतिक पुरस्कार,संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांच्या विजेत्यांची देखील नावं जाहीर करण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे विजेते-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:
श्री.सुरेशजी वाडकर (2023)
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार-
1)श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022)
2)श्री.अशोकजी समेळ(2023)
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे विजेते...
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) November 11, 2023
गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार:
श्री.सुरेशजी वाडकर (2023)
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार1)श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022)
2)श्री.अशोकजी समेळ(2023)@narendramodi @PMOIndia pic.twitter.com/GTSSMMe1JW
चित्रपट:
1) श्री चेतनजी दळवी (2022)
2) श्रीमती निशिगंधाजी वाड (2023)
किर्तन प्रबोधन:
1) श्रीमती प्राचीजी गडकरी (2022)
2) श्री. अमृत महाराजजी जोशी (2023)
वाद्य संगीत:
1)पं.श्री.अनंतजी केमकर (2022)
2) श्री शशिकांतजी सुरेश भोसले (2023)
कलादान:
1) श्रीमती संगीताजी राजेंद्र टेकाळडे ( 2022)
2) श्री यशवंत रघुनाथ तेंडोलकर (2023)
तमाशा:
1) श्री बुढ्ढणभाईजी बेपारी (वेल्हेकर) (2022)
2) श्रीमती उमाजी खुडे (2023)
आदिवासी गिरीजन:
1)श्री भिकल्याजी धाकल्या दिंडा (2022)
2)श्री सुरेशजी नाना रणसिंग (2023)
लोककला -1)श्री.हिरालालजी रामचंद्र सहारे (2022) 2)कीर्तनकार श्री. भाऊरावजी थुटे महाराज (2023) शाहिरी : 1)श्री. जयंतजी अभंगा रणदिवे (2022) 2)श्री. राजूजी राऊत (2023) नृत्य : 1)श्रीमती लताजी सुरेंद्र (2022) 2)श्री. सदानंदजी राणे (2023)
राज्य सांस्कृतिक पुरस्कार-
नाटक :
1)श्रीमती वंदनाजी गुप्ते (2022)
2)श्रीमती ज्येतीजी सुभाष (2023)
उपशास्त्रीय संगीत :
1)श्री मोरेश्वरजी निस्ताने (2022)
2)श्री. ऋषिकेशजी बोडस (2023)
कंठ संगीत :
1)श्रीमती अपर्णाजी मयेकर (2022)
2)श्री. रघुनंदनजी पणशीकर (2023)
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार-
1)श्रीमती नयनाजी आपटे (2022)
2)पं. श्री.मकरंदजी कुंडले (2023)
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार
1)पं.श्री.उल्हासजी कशाळकर (2022)
2)पं.श्री.शशिकांतजी(नाना)श्रीधर मुळ्ये (2023)
सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गायली आहेत. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. 'ओंकारा', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली', 'हिना', 'रंगीला', 'माचीस' यांसारख्या हिट चित्रपटांमधील गाणी सुरेश वाडकर यांनी गायली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर