Lapata Ladies: ऑस्करच्या शर्यतीसाठी थेट सिनेमाच्या नावातच बदल, किरण रावच्या 'लापता लेडीज'च्या नव्या पोस्टरची चर्चा
चित्रपटगृहांमध्ये 1 मार्च 2024 रोजी लापता लेडीज चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लापता लेडीजन प्रेक्षकांना भुरळ घातली.
Lapata Ladies: किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या सिनेमानं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर खास स्थान निर्माण केल्यानंतर या चित्रपटाने भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री घेतली. पण आता ऑस्करच्या शर्यतीसाठी थेट सिनेमाच्या नावातच बदल केल्याचं समोर येत आहे. आमिर खानची निर्मिती आणि किरण रावचे दिग्दर्शन असणाऱ्या लापता लेडीज या चित्रपटाच्या नव्या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा आहे. 'लापता लेडीज' च नाव आता 'लॉस्ट लेडीज' असं करण्यात आलं आहे. नावात बदल करून व नवप पोस्टर काढत हा सिनेमा अकॅडमी अवॉर्ड्सकडे पाठवण्यात आला आहे.
चित्रपटगृहांमध्ये 1 मार्च 2024 रोजी लापता लेडीज चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लापता लेडीजन प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटातलं 'सजनी रे' गाणं हे प्रत्येकाच्या ओठी रेंगाळलं. आता ऑस्करच्या शर्यतीसाठी नावात काहीसा बदल करत नवं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. फुल आणि जया यांची हृदयस्पर्शी गोष्ट या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. किरण राव आणि आमिर खान यांनी नुकतच न्यूयॉर्क शहरातही या सिनेमाचं प्रमोशन केल्याच दिसलं. लोकप्रिय शेफ विकास खन्ना यांनी हे या लापता लेडीज च्या प्रमोशनचा एक व्हिडिओ instagram वर शेअर केला आहे.
View this post on Instagram
लापता लेडीजला प्रेक्षकांची दाद
'लापता लेडीज'चं पहिलं स्क्रिनिंग गेल्या वर्षी टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालं होतं, जिथे त्याला प्रचंड प्रशंसा मिळाली. किरण रावचा हा चित्रपट मार्च 2024 मध्ये लिमिटेड स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली. 5 कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
या उत्कृष्ट चित्रपटासाठी अभिनेते नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांचंही खूप कौतुक करण्यात आलं आहे. महिलांवरील संवेदनशील विषयावर उत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल किरण राव यांच्या दिग्दर्शनाचंही खूप कौतुक झालं होतं.
काय आहे सिनेमाची गोष्ट?
लापता लेडीज ही दोन महिलांची गोष्ट आहे. नवीनच लग्न झालेला दीपक आपल्या बायकोला घेऊन त्याच्या गावी जातो. पण घरात नवरीचा पदर उचलला की सगळ्यांचेच डोळे उघडे राहतात. फूल कुमारीशी लग्न करायला गेलेला दीपक, पुष्पाला घरी घेऊन येतो. फुल कुमारी कुठे आहे आणि पुष्पा कोण आहे याचे रहस्य चित्रपटाच्या अखेरीस उलगडते. हा चित्रपट सामाजिक संदेशही देतो.