Lagnakallol : सनई चौघडे वाजणार, लग्न पंचक्रोशीत गाजणार; सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख आणि भूषण प्रधानचा 'लग्नकल्लोळ'! फर्स्ट लूक आऊट
Lagnakallol : 'लग्नकल्लोळ' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक आता आऊट झाला आहे.
Lagnakallol : 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. आता सिनेमागृहात धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे.
'लग्न कल्लोळ'च्या 'त्या' मोशन पोस्टरमधील पडदा उठला
काही दिवसांपूर्वीच 'लग्न कल्लोळ' सिनेमाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत.
सिद्धार्थ जाधवने शेअर केला 'लग्न कल्लोळ'चा फर्स्ट लूक!
सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित 1 मार्च 2024 रोजी उलगडणार आहे. सिद्धार्थ जाधवने या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं आहे,"आला रे आला... नवरामुलगा आला.. मारुती 'लग्न कल्लोळ".
मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित 'लग्न कल्लोळ' या सिनेमाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'लग्न कल्लोळ' सज्ज!
'लग्न कल्लोळ' सिनेमाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात,"लग्न कल्लोळ' या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की !".
डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे पुढे म्हणाले,"लग्न... हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळ्याचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या 'लग्न कल्लोळा'त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा".
संबंधित बातम्या