![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gracy Singh : एका चुकीच्या निर्णयामुळे संपलं 'लगान'च्या सुपरहिट अभिनेत्रीचं करिअर, ग्रेसी सिंहने ब्री-ग्रेड चित्रपटात काम का केलं?
Lagaan Actress Gracy Singh Story : लगान चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ग्रेसी सिंहच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं करिअर उद्धवस्त झालं.
![Gracy Singh : एका चुकीच्या निर्णयामुळे संपलं 'लगान'च्या सुपरहिट अभिनेत्रीचं करिअर, ग्रेसी सिंहने ब्री-ग्रेड चित्रपटात काम का केलं? Lagaan Actress Gracy Singh one bad decision ended her career krk b grade deshdrohi film ended career of superhit actress of lagaan marathi news Gracy Singh : एका चुकीच्या निर्णयामुळे संपलं 'लगान'च्या सुपरहिट अभिनेत्रीचं करिअर, ग्रेसी सिंहने ब्री-ग्रेड चित्रपटात काम का केलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/20/01fd41e177d4e7cd9ef218272bef6dd61721477186361322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लगान (Lagaan Movie) चित्रपटात गावातील साध्या-भोळ्या तरुणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ग्रेसी सिंह (Actress Gracy Singh) हिने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली होती. लगान चित्रपटामुळे ग्रेसी सिंहला खरी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील आधी ग्रेसीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं पण, तिला खरी प्रसिद्धी लगान चित्रपटामुळे मिळाली. ग्रेसी सिंहने चित्रपटांआधी मॉडेलिंग आणि टीव्ही कलाकार म्हणूनही काम केलं आहे. मुन्ना भाई एमबीबीएम चित्रपटातील सुमन या भूमिकेचीही खूप चर्चा झाली. पण ही सूपरहिट अभिनेत्री अचानक मोठ्या पडद्यावरुन गायब कशी झाली, हे जाणून घ्या.
एका चुकीच्या निर्णयामुळे संपलं 'लगान'च्या सुपरहिट अभिनेत्रीचं करिअर
ग्रेसी सिंह मॉडेलिंगसाठी मुंबईत आली होती. काही मॉडेलिंग वर्कशॉप केल्यानंतर तिने अने ब्रँड्ससोबत काम केलं. मॉडेलिंग करताना ग्रेसी सिंहला 'अमानत' या ट्वीव्ही मालिकेची ऑफर मिळाली. अमानत टीव्ही मालिका 1997 ते 2002 पर्यंत चालली. यानंतर ग्रेसी सिंहने 1999 मध्ये गुलजार यांच्या 'हू तू तू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1999 मध्ये ग्रेसी अनिल कपूर आणि काजोल स्टारर चित्रपट 'हम आपके दिल में रहते हैं' चित्रपटात सहाय्यक भूमिकेत देखील झळकली होती. यानंतर ग्रेसी सिंहला मोठी संधी मिळाली.
ग्रेसी सिंह प्रसिद्धीच्या शिखरावर
2001 मध्ये आलेल्या लगान चित्रपटात ग्रेसी सिंहने आमिर खानसोबत काम केलं. हा चित्रपट सूपरहिट ठरला. ग्रेसीने साकारलेल्या गौरीच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. या चित्रपटाली ओ री चोरी, राधा कैसे ना जले यांसारख्या गाण्यांनी ग्रेसीलाही खूप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर ग्रेसीला अजय देवगणसोबत गंगाजल आणि संजय दत्तसोबत मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे दोन्ही चित्रपट सुपरहिटही ठरले. त्यानंतर ग्रेसीने 2 तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं. लोकांना वाटू लागले की, ग्रेसी सिंह आता यशस्वी अभिनेत्री बनेल पण तसं झालं नाही.
जेव्हा ग्रेसी सिंगचे सर्व चित्रपट फ्लॉप होऊ लागले
त्यावेळी सर्वांना वाटत होते की ग्रेसी तिच्या करिअरमध्ये खूप पुढे जाईल. पण दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. 2003 नंतर, ग्रेसीचा एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर ग्रेसीने मुस्कान (2004), शरद (2004), वाज (2005), ये ही है जिंदगी (2005), चंचल (2007) या चित्रपटांमध्ये काम केले. ग्रेसी 'लख परदेसी होइये' या पंजाबी चित्रपटातही दिसली होती. पण जेव्हा लोकांनी केआरकेच्या 'देशद्रोही' चित्रपटात ग्रेसीला 2008 मध्ये पाहिले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
View this post on Instagram
देशद्रोही चित्रपटामुळे ग्रेसी सिंगची कारकीर्द संपुष्टात
ग्रेसी सिंगने केआरकेसोबत त्याच्या बी-ग्रेड चित्रपट देशद्रोहीमध्ये काम केलं. लगान, गंगाजल आणि मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या टॉप लेव्हल चित्रपटांमधील अभिनेत्री देशद्रोही सारख्या बी-ग्रेड चित्रपटात झळकल्यावर चाहत्यांची निराशा झाली. देशद्रोहीसारखा बी ग्रेड चित्रपट का साइन केला याचं उत्तर ग्रेसीनं कधीच दिलं नाही. पण, या चित्रपटानंतर ग्रेसी सिंहचे करिअर संपलं. त्यानंतर तिला कोणत्याही बिग बजेट चित्रपट मिळाली नाही.
View this post on Instagram
पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक
बरेच वर्ष इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. ग्रेसी सिंह 2015 मध्ये 'संतोषी माँ' या टीव्ही मालिकेमध्ये माँ संतोषीच्या भूमिकेत दिसली. या मालिकेचे दोन सीझन होते आणि दोन्ही सीझनमध्ये ती माता संतोषीच्या भूमिकेत होती. यानंतर ग्रेसी सिंग पुन्हा गायब झाली. ग्रेसी सिंह सध्या मुंबईत डान्स स्कूल चालवत असून तिचा एक डान्स ग्रुपही आहे, ती भारतात आणि परदेशात परफॉर्म करते. ग्रेसी सिंहने लग्न केलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हार्दिक-नताशा, ऋतिक रोशन-सुझेन की आमीर खान-टीना दत्ता, बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट कुणाचा?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)