Adipurush Trailer Launch: 'आदिपुरुष'च्या ट्रेलर लाँचला थिएटरमध्ये बसायला नव्हती जागा; क्रितीनं केलं असं काही की, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Adipurush Actress Kriti Sanon: 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चित्रपटामधील सर्व स्टार कास्टने हजेरी लावली. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) बसायला जागा मिळत नव्हती. ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही बसायला जागा मिळत नसल्यानं ट्रेलर पाहण्यासाठी खाली बसते.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामधील क्रितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिती ही खाली बसते. क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी क्रितीनं खास लूक केला होता. या कार्यक्रमासाठी तिनं व्हाईट आणि गोल्डन साडी, इअरिंग्स आणि गजरा असा ट्रेडिशनल लूक केला होता.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'आदिपुरुष'च्या ट्रेलरला मिळाली प्रेक्षकांची पसंती
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'मंगल भवन अमंगल हारी' हे गाणं ऐकू येते. 'ये कहानी है मेरे प्रभू श्रीराम की' या डायलॉगनं आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरमधील कलाकारांच्या डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे.
प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Adipurush Trailer OUT: 'ये कहानी है रामायण की'; आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस