Adipurush Trailer OUT: 'ये कहानी है रामायण की'; आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस
"आदिपुरुष" (Adipurush) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Adipurush Trailer OUT: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांचा "आदिपुरुष" (Adipurush) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आज "आदिपुरुष" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टी-सीरीजच्या यूट्यूब अकाउंटवर आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'मंगल भवन अमंगल हारी' हे गाणं ऐकू येते. 'ये कहानी है मेरे प्रभू श्रीराम की' या डायलॉगनं आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. ट्रेलरमधील कलाकारांच्या डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रभास, कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) , देवदत्त नागे (Devdatta Nage) आणि सनी सिंह (Sunny Singh) हे कलाकार आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमधील बॅकग्राऊंड म्युझिकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर काही जण या ट्रेलरमधील प्रभासच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
पाहा ट्रेलर
आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावरही लीक झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हैदराबादमध्ये ट्रेलरच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाची स्टार कास्ट
आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच लक्ष्मण या भूमिकेत सनी सिंह असणार आहे आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसरणार आहे.
प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण आता या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: