Koffee With Karan 7 : ‘मी पहिली ऑडिशन तुझ्या स्टुडंट ऑफ द इयरसाठी दिली होती’, क्रितीचं बोलणं ऐकून उडाला करणच्या चेहऱ्याचा रंग!
Koffee With Karan 7 : ‘हीरोपंती’ या चित्रपटामधून क्रिती आणि टायगर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघे आता ‘गणपत’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Koffee With Karan 7 : दर आठवड्याला करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan 7) शोमध्ये नवीन सेलिब्रिटी येतात, जे या मंचावर अनेक खुलासे करतात. या शोचा यंदाचा सीझनही खूप पसंत केला जात आहे. येत्या आठवड्यात करण जोहरच्या चॅट शोमध्ये क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) एकत्र दिसणार आहेत. या शोचा हा नववा एपिसोड असणार आहे. क्रिती आणि टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चाहत्यांना त्यांची ही जोडी खूप आवडते. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन्ही सेलिब्रिटी अनेक रहस्ये उघड करताना दिसले.
या प्रोमोमध्ये, क्रिती खुलासा करताना दिसत आहे की, तिने करणच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student of the year) चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. परंतु, या चित्रपटासाठी तिला नाकारण्यात आले होते. क्रितीचं हे बोलणं ऐकून करण मात्र चांगलाच गोंधळून गेला होता.
क्रितीने दिली होती करणच्या चित्रपटासाठी ऑडिशन
करण जोहरने क्रिती सेननला विचारलं होतं की, 'हिरोपंती'मधून पदार्पण करण्यापूर्वी तिला एखाद्या चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये नाकारण्यात आलं होतं? यावर क्रितीने सांगितले की, करण जोहरचा चित्रपट असलेल्या ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’च्या ऑडिशनसाठी ती पहिल्यांदाच गेली होती. या चित्रपटातून आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी पदार्पण केले होते. अभिनेत्री क्रिती सेननने सांगितले की, तिला या चित्रपटासाठी नाकारण्यात आले होते. क्रितीचे हे बोलणे ऐकून करण जोहरच्या चेहऱ्याचा रंग देखील उडाला होता. करणच्या प्रश्नाची गुगली त्यांच्यावरच उलटली होती.
पुन्हा एकदा झळकणार क्रिती आणि टायगरची जोडी
‘हीरोपंती’ या चित्रपटामधून क्रिती आणि टायगर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघे आता ‘गणपत’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्रिती आणि टायगरची चित्रपटांमधील केमिस्ट्री ही प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता त्यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री ‘कॉफी विथ करण’च्या आगमी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘कॉफी विथ करण’च्या या एपिसोडमध्ये क्रिती अनेक गौप्यस्फोट करणार आहे.
कॉफी विथ करण’मध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. ‘कॉफी विथ करण’चा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी 12 वाजता पाहू शकता. आतापर्यंत सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: