एक्स्प्लोर

'गानसरस्वती'ला संगीत जगतातील मान्यवरांची आदरांजली

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली. संगीत क्षेत्रातील मातब्बरांनीही किशोरीताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 'किशोरी आमोणकर जी यांचा स्वर्गवास झाल्याचं ऐकून मला अत्यंत दुःख झालं. त्या एक असामान्य गायिका होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो' अशा भावना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत. https://twitter.com/mangeshkarlata/status/848968474080751616 'किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. भारतीय शास्त्रीय संगीताचं अतोनात नुकसान झालं. त्यांची गायकी कायम स्मरणात राहील' अशा भावना प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केल्या आहेत. https://twitter.com/Shankar_Live/status/848970666330267648 किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय किशोरी आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1931 रोजी मुंबईत झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या त्यांच्या आई, तर माधवदास भाटिया हे त्यांचे वडील. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या किशोरी आमोणकर यांना ‘गानसरस्वती’ असं म्हटलं जातं. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर केली. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. पुरस्कार :
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985
  • पद्मभूषण पुरस्कार, 1987
  • संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 1997
  • पद्मविभूषण पुरस्कार, 2002
  • संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, 2002
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2009
किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :
  • अवघा रंग एक झाला
  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
  • माझे माहेर पंढरी
  • हे श्यामसुंदर राजसा
  • अवचिता परिमळु
  • कानडा विठ्ठल
  • अवघा तो शकुन
  • जनी जाय पाणियासी
  • जाईन विचारित रानफुला
  • पडिलें दूरदेशीं
  • पाहतोसी काय आता पुढे
  • मी माझें मोहित राहिलें
  • या पंढरीचे सुख
  • सोयरा सुखाचा विसांवा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल
'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल
Super Duperr Trailer Released: एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा; 'सुपर डुपर'चा धमाकेदार Trailer Released
Aishwarya Rai Bacchan Ponniyan Selvan Look: ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की..., ओळखलं का कोण?
ना दीपिका, ना प्रियांका अन् ना आलिया; 'ही' अभिनेत्री बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट, साडी चुरगळू नये म्हणून केलं असं काही की...
Raja Shivaji First Look Teaser: शौर्य, सन्मान अन् स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक; 'धुरंधर द रिव्हेंज'सोबत 'राजा शिवाजी'चा First Look Teaser थिएटरमध्ये रिलीज
स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक; 'धुरंधर द रिव्हेंज'सोबत 'राजा शिवाजी'चा First Look Teaser थिएटरमध्ये रिलीज

व्हिडीओ

Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget