एक्स्प्लोर

Kishore Kumar Birth Anniversary : कधी अभिनय तर कधी आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे किशोर कुमार; आजवर रिलीज झालं नाही शेवटचं गाणं

Kishore Kumar : लोकप्रिय पार्श्वगायक किशोर कुमार यांची आज जयंती आहे.

Kishore Kumar : आपल्या अभिनयाने आणि आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे किशोर कुमार (Kishore Kumar) यांची आज जयंती आहे. किरोश कुमार गायक, पार्श्वगायक, अभिनेता आणि दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता, पटकथालेखक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किशोर कुमार जिवंत नसले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्यांची क्रेझ कायम आहे. 

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशात झाला. त्यांनी हिंदीसह, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषांमधील गाणी गायली आहेत. किशोर कुमार यांचे खरं नाव आभास कुमार गांगुली आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी नाव बदललं. 

किशोर कुमार यांना अभिनयक्षेत्रात पदार्पण करायचं नव्हतं...

किशोर कुमार आणि अशोक कुमार एकमेकांचे नातेवाईक आहेत. किशोर कुमार यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करावं, अशी अशोक कुमार यांची इच्छा होती. पण सुरुवातीला अभिनेत्याने या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. किशोक कुमार यांनी गायक म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'बॉम्बे टॉकीज' या सिनेमासाठी किशोर कुमार यांनी पहिलं गाणं गायलं. तर 1946 मध्ये 'शिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

किशोर कुमार यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही मानधनाशिवाय गाणं गायलं नाही. किशोर कुमार यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी 131 गाणी गायली आहेत. यातील 115 गाणी सुपरहिट ठरली आहेत. पण 1980 नंतर किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांची जोडी तुटली. किशोर कुमार यांनी 'ममती की छांव' या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना विचारणा केली होती. पण हा सिनेमासाठी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे किशोर कुमार नाराज झाले आणि त्यांनी कधीही अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाणं गायलं नाही. 

किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत 16 हजार गाणी गायली आहेत. पण तरीही त्यांचं शेवटचं गाणं रिलीज झालेलं नाही. 2012 मध्ये 'ओशियन सिनेफॅन ऑक्शन'मध्ये शेवटचं 'नीलाम' हे गाणं गायलं. 15 लाख रुपयांत हे गाणं विकलं गेलं. पण त्यानंतरही हे गाणं रिलीज करण्यात आलेलं नाही. 

किशोर कुमार यांनी चार लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव  रूमा गुहा ठाकुरता असे होते. लग्नानंतर आठ वर्षांनंतर किशोर कुमार आणि रूमा यांचा घटस्फोट झाला. त्यांनतर 1960 साली मधुबाला यांच्यासोबत लग्न केले होते. वयाच्या 35 व्या वर्षी मधुबाला यांचे निधन झालं. त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बाली यांच्या सोबत लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी किशोर कुमार आणि  योगिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1980 मध्ये किशोर कुमार यांनी लीना यांच्यासोबत लग्न केले. 

संबंधित बातम्या

Blog : हमे तुमसे प्यार कितना…

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget