Khichdi 2 Teaser: खिचडी- 2 चा धमाकेदार टीझर रिलीज; यंदाच्या दिवाळीला फुटणार हास्याचे फटाके,पारेख कुटुंब करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Khichdi 2 Teaser: नुकताच खिचडी-2 चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Khichdi 2 Teaser: लेखक आतीश कपाडिया यांची 'खिचडी' (Khichdi) ही मालिका सप्टेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. कलाकारांची विनोदी शैली आणि कथानक यांमुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. शोमधील पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर खिचडी मालिकेतील भूमिकांवर आधारित एक चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव खिचडी हेच होते. आता खिचडी या (Khichdi 2) चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकताच खिचडी-2 चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये खिचडी चित्रपटामधील कलाकार तसेच दिग्दर्शिका फराह खान देखील दिसत आहे. फराह खाननं खिचडी या चित्रपटात देखील कॅमिओ केला होता. आता ती खिचडी-2 चित्रपटात देखील काम करत आहे.टीझरमध्ये पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज दिसत आहे. या टीझरच्या शेवटी ‘खिचडी 2-मिशन पंथुकिस्तान’ असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच "या दिवाळीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये", असंही या टीझरमध्ये लिहिलेलं दिसत आहे. प्रेक्षक खिचडी 2 चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
कीर्ती कुल्हारीनं खिचडी-2 या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "इस दिवाली, हंसी का धमाका सिनेमाघरो में"
पाहा टीझर
View this post on Instagram
खिचडी 2 (Khichdi 2) या चित्रपटात हंसा पारेख ही व्यक्तिरेखा सुप्रिया पाठक (Supriya Pathak) यांनी साकारली आहे. खिचडी या चित्रपटामधील सुप्रिया पाठक यांच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकली होती. सुप्रिया पाठक कपूर, राजीव मेहता ( Rajeev Mehta), अनंग देसाई (Anang Desai), वंदना पाठक (Vandana Pathak), कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आणि जमनादास मजेठिया हे कलाकार खिचडी 2 या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
अभिनेत्री निमिषा वखारिया (Nimisha Vakharia) यांनी खिचडी या चित्रपटात जयश्री ही भूमिका साकारली होती. आता खिचडी-2 (Khichdi 2) चित्रपटामधील ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठक या साकारणार आहेत. प्रेक्षक खिचडी 2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :