Yash : केजीएफ फेम यशनं आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी दिलं 50 कोटींचं दान? व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य काय?
अभिनेता यशचा (Yash) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे यशनं आयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी 50 कोटी दान केले, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Yash : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता यशनं (Yash) त्याच्या केजीएफ या चित्रपटातील स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचे चाहते त्याला 'रॉकिंग स्टार' असंही म्हणतात. यशचा चाहता वर्ग मोठा आहे.यश हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यशचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे यशनं आयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी 50 कोटी दान केले, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण यशच्या या व्हायरल फोटोमध्ये लिहिलेलं कॅप्शन खोटं आहे. जाणून घेऊयात या व्हायरल फोटो मागील सत्य...
व्हायरल फोटोमध्ये यश हा एका मंदिराच्या बाहेर उभा आहे, असं दिसत आहे. कपाळावर टिळा आणि खांद्यावर शाल अशा लूकमध्ये यश दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, आयोध्यामध्ये राम मंदिर उभारणीसाठी यशनं 50 कोटी दान केले. ही पोस्ट खोटी आहे.
फोटोमागील सत्य
यशचा हा व्हायरल फोटो एप्रिल 2022 मधील आहे. केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपट रिलीज होण्याआधी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी यशनं तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली होती, तेव्हाचा मंदिराबाहेरील यशचा फोटो हा आत्ता व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल फोटो:
केजीएफ-3 येणार प्रेक्षकांच्या भेटीस:
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी यशच्या केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. केजीएफ चॅप्टर-2 हा 2018 च्या केजीएफचा सिक्वेल आहे. निर्माते विजय किरगंदूर यांनी माहिती दिली की, केजीएफ चॅप्टर 3 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. ते म्हणाले, 'दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 30 ते 35 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे.' केजीएफ-3 ची यशचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: