Katrina Kaif : कतरिना कैफ देणार गुड न्यूज? बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Katrina Kaif : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Katrina Kaif Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे कतरिनाच्या बेबी बंपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे.
कतरिना खरचं आई होणार?
कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे कतरिना गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. कतरिना आई होणार असल्याने तिचे चाहते खूश झाले आहेत. पण व्हायरल होणार कतरिनाचा फोटो 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या सेटवरचा आहे. त्यामुळे कतरिनाचा बेबी बंप खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. 'मेरी ख्रिसमस' या सिनेमात कतरिना आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
'मेरी ख्रिसमस'च्या माध्यमातून कतरिनाचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण
कतरिनाचा आगामी 'मेरी ख्रिसमस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच या सिनेमाच्या माध्यमातून कतरिना दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमाची कतरिनाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. तसेच या सिनेमात आईच्या भूमिकेत कतरिनाला पाहायला चाहते उत्सुक आहेत.
कतरिनाकडे सिनेमांची रांग!
कतरिनाचा 'फोन भूत' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' हे कतरिनाचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
कतरिना-विकीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार...
कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. अशातच इटाईम्सच्या व्हिडीओने चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे.
संबंधित बातम्या