Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ-विकी कौशलचा असाही विक्रम; लग्नाच्या फोटोंना केवळ 20 मिनीटात 10 लाख लाईक्स
Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत.
Katrina-Vicky Wedding Pics : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. कतरिना कैफ विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंना 20 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. विकी कौशलने नुकतेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत.
विकी कौशलने फोटो शेअर करत लिहिले आहे,"आम्ही एकत्र या नवीन प्रवासाची सुरुवात करत असताना तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागत आहोत". विकी-कतरिनाच्या फोटोंवर चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कतरिना आणि विकी 12 डिसेंबरपर्यंत सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.
View this post on Instagram
सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महलासमोरील मोकळ्या बागेत विकी कतरिनाच्या स्वप्नातील लग्नाचा मंडप उभारला गेला होता. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला.
लग्नात स्वादिस्ट जेवणाची व्यवस्था
कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. सवाई माधोपूरच्या जोधपूर स्वीट होमने लग्नसोहळ्यात मिठाई पाठवली होती. लग्नासाठी जोधपूरची प्रसिद्ध डिश 'मावा कचोरी' आणि बिकानेरची 'गोंड पाक' मिठाई पाठवण्यात आली होती. याशिवाय नाश्त्यामध्ये गुजराती ढोकळा, समोसा आणि कचोरी देण्यात आली.