Katrina Kaif : कतरिना-विकीचा रोमँटिक फोटो; पण मिसेस कौशलच्या ड्रेसच्याच रंगल्या चर्चा, किंमत ऐकून बसेल धक्का
Katrina Kaif : कतरिनाने विकीसोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमधील कतरिनाच्या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही थक्का व्हाल
Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी सध्या चर्चेत आहे. कतरिना आणि विकीने लग्नानंतरचा पहिला नाताळ सण नुकताच साजरा केला. कतरिनाने विकीसोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमधील कतरिनाच्या ड्रेसने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले. कतरिनाच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये विकी व्हाईट शर्ट आणि पेस्ट पिंक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. तर फ्लोरल प्रिंट असलेला क्रिम कलरच्या मिनी ड्रेसमधील क्लासी लूकमध्ये कतरिना दिसत आहे. कतरिनाचा हा ड्रेस 'Zimmermann' या ब्रँडचा आहे. या ड्रेसचे फॅब्रिक हे जॉर्जेट आहे. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार,कतरिनाच्या या ड्रेसची किंमत 64,086 रुपये आहे.
View this post on Instagram
राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. एका रिपोर्टनुसार, लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. त्यानंतर लगेचच दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. पण नाताळच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकदा एकत्र आले. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या सि-फेसिंग फ्लॅट शेजारीच कतरिना आणि विकीने एका फ्लॅट भाड्याने घेतला आहे.
संबंधित बातम्या
katrina Vicky Wedding : कतरिना-विकीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर
Bollywood 5 Richest Couples: बॉलिवूडमधील 5 श्रीमंत कपल्स; संपत्ती माहितेय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha