Katrina Kaif : लग्नाआधी नववधू कतरिना कैफ कुटुंबासह पोहोचली विकी कौशलच्या घरी
Katrina-Vicky : कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच सात फेरे घेणार आहेत. त्याआधी कतरिना तिच्या कुटुंबासह विकी कौशलच्या घरी पोहोचली आहे.
Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. दरम्यान कतरिना कैफ तिच्या कुटुंबासह विकी कौशलच्या घरी पोहोचली आहे, असे म्हटले जात आहे.
कतरिना आणि विकी यांचा तीन दिवस चालणारा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये होणार आहे. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे.
View this post on Instagram
कतरिना आणि विकीमधल्या प्रेमाची पहिली ठिणगी कॉफी विथ करणमध्ये पडली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठीच्या आणि मैत्रीच्या चर्चा सुरू झाल्या. दोघे डेट करत असल्याच्या चर्चादेखील बॉलिवूडमध्ये बराच वेळ रंगत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. अनुष्का-विराट, दीपिका-रणवीर पाठोपाठ विकी-कतरिनानंही नंबर लावल्याचं समजतंय आणि आता यांच्या लग्नाचा बार उडणार आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
संबंधित बातम्या
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : कॅट आणि विकीची लगीनघाई, 'या' दिवशी होणार लग्नासाठी रवाना...
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कतरिना आणि विकीच्या लग्नाचं आमंत्रण
Dream Proposal : 'आय लव्ह यू कतरिना...', विकी कौशलने केलं कतरिनाला भन्नाट पद्धतीने प्रपोज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha