Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला; आभार मानत म्हणाली, "अहोरात्र मेहनत घेणारे मुख्यमंत्री"
Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Kartiki Gaikwad On CM Eknath Shinde : 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्सच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या चर्चेत आहे. कार्तिकीने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांचे आभारदेखील मानले आहेत.
कार्तिकीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिकी तिचे वडिल कल्याणजी गायकवाड, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड, आणि पती रोनित पिसे आणि पं. कल्याणजी गायकवाड यांचा शिष्य परिवारासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. कार्तिकी आणि तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत ज्ञानेश्वर माऊली यांची फ्रेम भेट म्हणून दिली आहे.
कार्तिकीच्या बाबांनी 'वारकरी संगीत' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यासाठी कार्तिकी ठाण्यातील आनंद आश्रमात आली होती. या पुस्तक प्रकाशनासोबत गुरुपुजन सोहळा भव्य नागरी सत्कारसोहळ्याचा कार्यक्रमदेखील पार पडणार आहे. कार्तिकीच्या बाबांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा कंठ संगीत पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शासनाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी कार्तिकी गायकवाडची खास पोस्ट
कार्तिकीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"महाराष्ट्र शासनाकडून बाबांना कंठ संगीत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शासनाप्रती कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची आनंद आश्रम ठाणे येथे सदिच्छा भेट घेतली".
View this post on Instagram
कार्तिकीने पुढे लिहिलं आहे,"महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहात रात्री 2-3 वाजेपर्यंत आपण लोकांना भेटता हे काल प्रत्यक्ष पाहिले एक व्यक्ती म्हणुन आपल्याविषयीचा आदर आणखी द्विगुणीत झाला. आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा".
'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडबद्दल जाणून घ्या... (Who Is Kartiki Gaikwad)
सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. कार्तिकीचं 'घागर घेऊन' हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
संबंधित बातम्या