Kartiki Gaikwad Ronit Pise : 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडच्या अरेंज मॅरेजची स्टोरी माहीत आहे का? जाणून घ्या...
Kartiki Gaikwad : गायिका कार्तिकी गायकवाडचा पती रोनित पिसे हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे.
Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी लाडक्या कार्तिकीने रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 'अपोझिट पोल्स अट्रॅक्ट्स इच अदर' असं म्हणत कार्तिकी रोनितसोबत लग्नबंधनात अडकली आहे.
कार्तिकीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट काय आहे? (Kartiki Gaikwad Wedding Story)
कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेच्या लग्नाची स्टोरी (Kartiki Gaikwad Ronit Pise Wedding Story) खूपच रंजक आहे. कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. त्यामुळे एकेदिवशी रोनितच्या आईने कार्तिकीच्या वडिलांना रोनितची पत्रिका दाखवली आणि विचारलं की तुमच्या ओळखीत कोणी मुलगी आहे का?
View this post on Instagram
रोनितच्या आईच्या प्रश्नानंतर कार्तिकीच्या वडिलांच्या मनात लेकीच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित झाला. अखेर काही दिवसांनी त्यांनी रोनितसाठी कार्तिकीचं नाव सुचवलं आणि रोनित आणि कार्तिकीनेदेखील एकमेकांना होकार दिला. रोनितची आई आणि कार्तिकीचे वडिल यांच्यात मैत्रीचं नातं असलं तरी कार्तिकी आणि रोनितची भेट मात्र लग्न ठरवण्यावेळीच झाली होती.
कार्तिकी गायकवाडचा नवरा कोण आहे? (Who is Ronit Pise)
कार्तिकीचा पती रोनित पिसे (Ronit Pise) हा पुणेकर आहे. रोनित हा मॅकेनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वत:चा व्यवसायदेखील आहे. कार्तिकी अनेकदा रोनितसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दोघांचे रोमॅंटिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. कार्तिकीप्रमाणेच रोनितलादेखील संगीताची आवड आहे.
कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. 26 जुलै 2020 रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्तिकीचा साखरपुडा झाला. कार्तिकीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर काही महिन्यांनी ती रोनितसोबत लग्नबंधनात अडकली. कार्तिकीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. अल्वाधतीतच तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आवाजाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या