Kartik Aaryan : कार्तिक आर्यन बोहल्यावर चढणार? फोटो शेअर करत म्हणाला,"लग्नासाठी तयार"
Kartik Aaryan Wedding : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अभिनेत्याच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
![Kartik Aaryan : कार्तिक आर्यन बोहल्यावर चढणार? फोटो शेअर करत म्हणाला, Kartik Aaryan Wedding Post Bollywood Actor Ready for Marriage shares in black kurta pajama Photo Know Entertainment Latest Update Marathi News Kartik Aaryan : कार्तिक आर्यन बोहल्यावर चढणार? फोटो शेअर करत म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/17/b030d8ea988c2e5ed03f3cf63dba481d1708174074163254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartik Aaryan : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अनेक तरुणींचा क्रश आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अभिनयासह तो त्याच्या क्यूटनेसमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर त्याच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर तो व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यासंबंधित पोस्ट शेअर करत असतो. कार्तिक आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या डेटिंगच्याही चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्याच्या एका पोस्टमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
कार्तिक आर्यनची पोस्ट काय? (Kartik Aaryan Post)
कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेता काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे,"लग्नासाठी तयार". कार्तिकच्या या कॅप्शनमुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे.
View this post on Instagram
कार्तिकच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
कार्तिक आर्यनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कधी आणि कुठे लग्न होणार आहे? मला तुझ्या नावाचं कुंकू लावायचं आहे, मी तुझीच वाट पाहत आहे, नक्की कोणाचं लग्न आहे? माझं कार्तिकवर प्रेम आहे, अशा कमेंट्स कार्तिकच्या चाहत्यांनी केल्या आहेत. कार्तिकच्या आगामी सिनेमांसह त्याच्या लग्नाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Kartik Aaryan Upcoming Movies)
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमातील अभिनेत्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. आता या सिनेमाच्या सीक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 'भूल भुलैया'च्या सीक्वेलसह 'चंदू चॅम्पियन','आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' सारख्या सिनेमांतही कार्तिकच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा कार्तिकचा शेवटचा सिनेमा. 2023 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तो कियारा आडवाणीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. दोघांच्या केमिस्ट्रीचं प्रचंड कौतुक झालं.
संबंधित बातम्या
Kartik Aaryan : तब्बल एका वर्षाने कार्तिकने घेतला मिठाईचा आस्वाद; म्हणाला,"मिठाईपेक्षाही 'तू' आहे माझी फेव्हरेट"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)