![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे, ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी 14 महिने घेतली कठोर मेहनत
Kartik Aaryan New Movie : अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी मराठीचे धडे गिरवत असल्याचं समोर आलं आहे.
![Kartik Aaryan : कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे, ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी 14 महिने घेतली कठोर मेहनत Kartik Aaryan Upcoming Movie Chandu Champion will release on 14th june 2024 took serious efforts for Marathi Language Entertainment latest bollywood update detail marathi news Kartik Aaryan : कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे, ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी 14 महिने घेतली कठोर मेहनत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/9edf11198861ee5bbb9772a1d53668831712217845748720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartik Aryan New Movie : साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) आणि कबीर खान (Kabir Khan) यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) हा यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाद्वारे एक विलक्षण कथा सिनेरसिकांसमोर सादर होणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा प्रमुख भूमिकेत असून यापूर्वी न साकारलेल्या नव्या अवतारात दिसणार आहे. दरम्यान त्याची ही भूमिका परिपूर्णतेने वठवण्याकरता तो मनापासून प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय.
सुपरस्टार कार्तिकने या चित्रपटाकरता शारीरिकदृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत घेतलीये. इतकच नाही तर त्याने त्या व्यक्तिरेखेसाठी मराठी भाषासंपदा आणि उच्चार यांवरही कमालीची मेहनत घेतली आहे. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक अत्यंत वेगळी भूमिका वठवत असून ती हुबेहूब साकारण्यासाठी त्याने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही.
View this post on Instagram
14 महिन्यांची मेहनत
या चित्रपटात कार्तिकला अस्खलित मराठी बोलता यावे म्हणून त्याने गेली 14 महिने कठोर मेहनत घेतली आहे. एका जाणकार भाषा प्रशिक्षकाच्या मदतीने कार्तिकला मराठी भाषेवर पकड मिळवणे शक्य झाले. यामुळे ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील कार्तिकच्या भूमिकेबाबत सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे.साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांची निर्मिती असलेला 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
आरोह वेलणकर दिसणार या चित्रपटात?
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आरोहने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन आर्यनसोबत फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करुन आरोहनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "And its a wrap.अद्भुत लोकांसोबत या अद्भुत चित्रपटाचे शूटिंग करताना मजा आली. पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाची वाट पाहत आहे." कबीर खाननं बजरंगी भाईजान, 83, एक था टायगर, ट्युबलाईट यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)