Karnan Release Date: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या 'कर्णन' सिनेमाची प्रदर्शनची तारीख जाहीर, फर्स्ट लूकही रिलीज
धनुषने ट्वीट करून या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे, ज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या 'कर्णन' सिनेमामुळे चर्चेत आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. धनुषने त्याच्या कर्णन चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. सोबतच त्याने सिनेमाचा त्याने पहिला लूकही शेअर केला आहे.
धनुषने ट्वीट करून या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे, ज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच धनुषने चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले होते. याबाबत माहिती देताना त्यांने चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. सिनेमातील त्याला रोल नक्कीच दमदार असेल असं फोटोतून दिसून येत आहे. धनुषच्या फर्स्ट लूकमध्ये चौकटीची शर्ट, हातात बेड्या आणि कपाळावरील जखमेतून रक्त वाहताना दिसत आहे.
#Karnan first look and “THEATRICAL RELEASE”date !! pic.twitter.com/N5gx88XgWr
— Dhanush (@dhanushkraja) February 14, 2021
कलापुली एस. थानू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. धनुष आणि मारी पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. तिरुनेवलीजवळ घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट अॅक्शन एंटरटेन्टर असेल. या चित्रपटात अॅक्शन डायरेक्टर लाल आणि नटराजनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत संतोष नारायण यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
