Bollywood Kissa : अभिनेत्रीने आईसमोरच शूट केला मोठा किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकनंतर पूर्ण झाला शॉट
Karisma Kapoor Kissing Scene : अभिनेत्री करिश्मा कपूरने राजा हिंदुस्तानी चित्रपटासाठी अभिनेता आमिर खानसोबत किसिंग सीन दिला होता, जो शूट करण्यासाठी तीन दिवस लागले होते.
![Bollywood Kissa : अभिनेत्रीने आईसमोरच शूट केला मोठा किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकनंतर पूर्ण झाला शॉट karisma kapoor gave longest kissing scene in front of her mother three days shoot 47 retake for raja hindustani movie karishma kapoor with co star amir Khan marathi news Bollywood Kissa : अभिनेत्रीने आईसमोरच शूट केला मोठा किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकनंतर पूर्ण झाला शॉट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/22/1706469c62e39fc932d4bb8a6cb8c9da1726995566733322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karisma Kapoor Kissing Scene : अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवला. करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिच्या नटखट आणि चंचल शैलीमुळे तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. त्यासोबत तिने गंभीर भूमिकांनाती तितकाच न्याय दिला. करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा राजा हिंदुस्तानी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. राजा हिंदुस्तानी चित्रपट करिश्माच्या करियरमध्ये मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी तर खळबळ माजवली होती. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली होती, जी आजही ऐकली जातात. या चित्रपटातील करिश्मा आणि आमिरच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती.
अभिनेत्रीने आईसमोरचं शूट केला मोठा किसिंग सीन
करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा राजा हिंदुस्तानी चित्रपटात ऑन स्क्रिन रोमांन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यांची केमिस्ट्री आणि चित्रपटाचं कथानक याने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीचीही खूप चर्चा झाली होती. हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत आला होता. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि आमिर खान यांनी किसिंग सीन केला होता. करिश्मा आणि आमिरच्या किसिंग सीनमुळेही हा चित्रपट खूप चर्चेत होता.
राजा हिंदुस्तानी चित्रपटातील किसिंग सीनचा किस्सा
राजा हिंदुस्तानी चित्रपटातील किसिंग सीन शूट करण्यामागे मोठा रंजक किस्सा आहे. करिश्मा कपूरने हा सीन तिच्या आईसमोर शूट केला होता. किसिंग सीन आधी अस्वस्थ झाली होती. हा किसिंग सीन शूट करण्यासाठी खूप वेळ लागला होता. या किसिंग सीनसाठी 47 रिटेक घ्यावे लागले होते. खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी हा किसिंग सीन शूट करतानाचा किस्सा सांगितला होता.
View this post on Instagram
तीन दिवस आणि 47 रिटेक
दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी सांगितलं की, करिश्मा कपूरची आई म्हणजेच बबिता कपूर यांच्या मदतीमुळे हा सीन पूर्ण होऊ शकला. किसिंग सीन शूट करताना बबिताने करिश्माला खूप शांत आणि कर्फटेबल केलं होतं. करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्यातील किसिंग सीन शूट करण्यासाठी तीन दिवस आणि 47 रिटेक घेतले होते. चित्रपटातील किसिंग सीनचं पोस्टर बनवण्याची प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवण्याची योजना त्यांनी आखली होती. पण, त्यानंतर ही योजना रद्द केल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. चित्रपटाचा हा सीन उटीमध्ये शूट करण्यात आला होता.
करिश्मा नाही अभिनेत्री 'ही' होती चित्रपटासाठी पहिली पसंती
धर्मेश दर्शनने मुलाखतीत सांगितले होते की, करिश्मा कपूर नाही तर जूही चावला ही महिला लीडसाठी पहिली पसंती होती. 'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितसारखी भूमिका साकारायची आहे, असे दिग्दर्शकाने सांगितले होते, पण माधुरीचे नाव घेतल्यावर जुही चावला नाराज झाली होती. या चित्रपटासाठी निर्मात्याने पूजा भट्ट आणि ऐश्वर्या राय यांच्याशीही संपर्क साधला होता पण त्यांनीही स्क्रिप्ट नाकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)